लंडन मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय स्मारकाला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली भेट

    21-Sep-2026
 
 
 
Dr Babasaheb Ambedkar Memorial London
 
 
मुंबई;(Dr Babasaheb Ambedkar Memorial London): लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय स्मारकाला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज भेट देऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 14 नोव्हेंबर 2015 रोजी या स्मारकाचे लोकार्पण झाले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून लंडन मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे हे किंग हेन्री रोडवरील निवासस्थान संग्रहालयरूपी स्मारक उभारण्यात आले आहे.(Dr Babasaheb Ambedkar Memorial London)

या स्मारकाला ना. रामदास आठवले यांनी आज भेट देऊन स्मारकाची पाहणी केली.या संग्रहालय स्मारक इमारतीची डागडुजी दुरुस्ती करण्याची गरज असून आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून लंडन मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय स्मारकाच्या संवर्धन आणि देखभालीसाठी नव्याने दुरुस्ती करण्याची मागणी करणार असल्याचे ना. रामदास आठवले यांनी कळविले आहे. या स्मारकात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र त्यांची संविधान सभेतील भाषणे तसेच त्यांची अनेक गाजलेली महत्वाची भाषणे दाखविणारे व्हिडिओ दालन या संग्रहालयात उभारले पाहिजे अशी आपली सूचना असल्याचे ना. रामदास आठवले यांनी कळविले आहे.(Dr Babasaheb Ambedkar Memorial London)

यावेळी ना. रामदास आठवले यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सौ सीमाताई आठवले; पुत्र जीत आठवले; चंद्रशेखर कांबळे माधुरी चंद्रशेखर कांबळे; अविनाश कांबळे; माधुरी अविनाश कांबळे; गौतमी चंद्रशेखर कांबळे; दीक्षा चंद्रशेखर कांबळे आदी लंडन दौऱ्यात ना. रामदास आठवले यांच्या समवेत आहेत.(Dr Babasaheb Ambedkar Memorial London)
 
 
 
 
 






संबंधित मजकूर