मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येणारा १.१३ कोटींचा अवैध गुटखा जप्त!६ तासांच्या थरारक पाठलागानंतर चौघांना अटक

    21-Sep-2026
₹1.13 crore gutkha seized
 
 
मुंबई (₹1.13 crore gutkha seized) : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे आणला जाणारा तब्बल १ कोटी १३ लाख ५४ हजार ६०० रुपये किमतीचा बंदी असलेला गुटखा आणि पान मसाला जप्त केला आहे. सुमारे सहा तास चाललेल्या थरारक पाठलागानंतर ही मोठी खेप पकडण्यात यश आले असून, या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली.(₹1.13 crore gutkha seized)
 
मिळालेल्या माहितीनुसार, एफडीए अधिकाऱ्यांना मध्य प्रदेशातून एका ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर बंदी घातलेल्या गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार हा ट्रक सुरुवातीला समृद्धी महामार्गावरून ठाण्यातील भिवंडीच्या दिशेने जात होता. मात्र, अचानक ट्रकने मार्ग बदलून संगमनेरमार्गे पुण्याच्या दिशेने प्रवास सुरू केला. संशय बळावल्याने एफडीएच्या पथकांनी वेगवेगळ्या संभाव्य मार्गांवर नाकाबंदी केली.(₹1.13 crore gutkha seized)
 
ठाणे विभागाचे पथक मुरबाडच्या दिशेने, तर पुणे विभागाचे पथक राजगुरुनगर येथे तैनात करण्यात आले. राजगुरुनगर टोल नाक्यावर अन्न सुरक्षा अधिकारी लक्ष्मीकांत सावळे यांनी आपले वाहन ट्रकच्या आडवे लावून तो थांबवण्याचा इशारा केला. परंतु, चालकाने ट्रक न थांबवता वेगाने पुढे पळवला. त्यानंतर सावळे यांनी तातडीने ट्रकचा पाठलाग सुरू केला. पाठोपाठ स्थानिक पोलिसांनीही या मोहिमेत सहभाग घेतला. तब्बल ६ तास चाललेल्या या थरारानंतर रात्री ८ वाजेच्या सुमारास चाकण-तळेगाव चौकात ट्रकला घेराव घालून यशस्वीपणे अडवण्यात आले.(₹1.13 crore gutkha seized)
 
ट्रकची झडती घेतली असता त्यात महाराष्ट्रात पूर्णपणे बंदी असलेले विविध नामांकित ब्रँडचे पान मसाला आणि फ्लेवर्ड तंबाखूचे पोते आढळून आले. जप्त केलेल्या सर्व मालाची एकूण किंमत १ कोटी १३ लाख ५४ हजार ६०० रुपये आहे. या प्रकरणी पिंपरी-चिंचवडमधील चाकण पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून नफीस मेहबूब खान, निलेश राठी, अरुण पाटील, संजय माता या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.(₹1.13 crore gutkha seized)
 
हा प्रतिबंधित साठा मध्य प्रदेशातून नेमका कोणी पाठवला, महाराष्ट्रात तो कोणाला वितरित केला जाणार होता आणि या नेटवर्कमध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, याचा शोध सध्या चाकण पोलीस आणि एफडीएचे पथक संयुक्तपणे घेत आहेत. सार्वजनिक आरोग्याशी खेळणाऱ्या अशा अवैध व्यापाराविरुद्ध भविष्यातही अशीच कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.(₹1.13 crore gutkha seized)
 
संघटित गुन्हेगारीचा संशय; 'मकोका' लावण्याची एफडीएची मागणी
 
हा केवळ अन्नसुरक्षेच्या नियमांचा भंग नसून त्यामागे एक मोठे संघटित सिंडिकेट कार्यरत असल्याचा संशय एफडीएने व्यक्त केला आहे. बंदी असलेला माल एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्यभरात पोहोचवण्याचे जाळे सक्रिय असल्याने, या संपूर्ण पुरवठा साखळीचा आणि आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, या प्रकरणातील आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई करता येईल का, याची चाचपणी करण्याची विनंतीही एफडीएने पोलिसांना केली आहे.(₹1.13 crore gutkha seized)
 
 




संबंधित मजकूर