हिंदूंच्या एकजुटीचे प्रतिक असणारी कल्याणची मेळा संघ विसर्जन मिरवणूक...

    21-Sep-2026


Kalyan Mela Sangh
 
 
विशाल वैद्य(Kalyan Mela Sangh):- लोकमान्य टिळकांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर मुंबई आणि पाठोपाठ १८९५ मध्ये कल्याणमध्ये ही प्रथा सुरू झाली. तेव्हापासून सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेला कल्याण शहरात प्रचंड महत्त्व आहे. उलट त्याकाळी मुंबई पेक्षाही कल्याणातले गणपती बघण्यासाठी मोठी उत्सुकता असायची आणि कल्याण कारान्नाही पुण्यातले गणपती बघण्याची ओढ असायची... मात्र कल्याणमधील गणेशोत्सवच इतका दिमाखात व्हायचा कि पुण्यातील देखावे पाहण्यासाठी जाणे शक्य नसायचे त्यामुळेच खुद्द लोकमान्य टिळकांच्या मार्गदर्शनानुसार काही मंडळांनी एक नामी शक्कल काढली. एकादशीच्या दिवशी गणेशमूर्तीचे विसर्जन करून उरलेले दोन दिवस पुण्यातील गणेशदर्शनाला निघायचे,तो पर्यंत पुण्यातीलही मंडळांचे कार्यकर्ते कल्याणात येउन दर्शन घ्याय्चे. अशी परंपराच त्यांतर कल्याणमध्ये सुरू झाली. अशा एकादशीच्या दिवशी विसर्जन करणाऱ्या मंडळांच्या गणरायांना ‘मेळय़ाचे गणपती’ असे संबोधले जाऊ लागले. जगात इतरत्र सहसा कुठे न आढळणारी एकादशीच्या विसर्जनाची परंपरा कल्याणमध्ये आजपर्यंत पाळली जात आहे.. कल्याण गावाचा गणपती म्हणून सुभेदारवाडय़ात गणपती बसविण्यास सुरुवात झाली. त्याव्यतिरिक्त प्रत्येक ज्ञाती समाजाच्या बांधवांनी,बारा बलुतेदारांनी आपापला सार्वजनिक गणपती बसविण्यास सुरुवात केली.(Kalyan Mela Sangh)
 
यामध्ये कासार समाज, मराठा समाज,वाणी समाज,तेली समाज,कुंभार समाज,पठारे प्रभू समाज,देवज्ञ समाज,धनगर समाज इत्यादी समाजाचे मिळून १२ ते १४ गणपतींनी मेळा संघाची सुरुवात झाली ती पुढे वाढत ३६ पर्यंत गेली होती आता मात्र कालोघात यंदा १२ गणपती मेळा संघात आहेत. १९२५-३० पर्यंत शहरातील ज्ञाती समाजांचे गणपती सुभेदार वाडय़ाजवळ येत असत. शहरातील मिरवणुकीचा मार्ग ठरलेला असायचा तशी मिरवणूक निघून काळा तलावात(भगवा तलाव) गणपती विसर्जित केले जात.(Kalyan Mela Sangh)
 
धर्मान्धाकडून विसर्जनाला विरोध
 
सर्व ज्ञाती बांधव जातपात विसरून एकत्र येत हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण गणेशोत्सव साजरा करत होते हे बघून साधारण १९२५ ते १९२६ च्या सुमारास कल्याणातील धर्मांध जिहादी वृत्तीच्या मुसलमानांना पोटशूळ उठला आणि त्यांनी काळा तलाव येथे गणेश विसर्जन करण्यास बंदी घालण्याची मागणी करत मोठी दंगल घडवून आणली..ऐन गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान मुस्लिमांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे हिंदू समाजातही संतापाची लाट उसळली आणि सर्व समाज बांधवानी एकत्र येऊन हिंदूंची एकजूट दाखवून देत धर्मांधांना चोख प्रत्युत्तर देऊन बंदी मोडून काढली.त्या वेळी धर्मांध मुसलमानांची दादागिरी मोडून काढून सर्वात प्रथम सामोरा जात आपला गणपती विसर्जित केला तो तेली समाजाने.त्यांतर इतरही सर्व ज्ञाती समाजानी अप्पापले गणपती विरोध आणि दादागिरी मोडून त्याच ठिकाणी विसर्जित केले.तेव्हापासूनच मेळा संघात मानाचे प्रथम स्थान हे तेली समाजच्या गणपतीला मिळाले आहे ते आज तागायत सुरु आहे..त्यामुळेच गणेशोत्सवाची सुमारे १३२ वर्षांपासून अत्यंत वैभवशाली परंपरा असणाऱ्या कल्याण शहरात हिंदू धर्मियांच्या एकजुटीचे प्रतिक म्हणून ओळखली जाणारी मेळा संघाची विसर्जन मिरवणूकही संपूर्ण देशात आपले वेगळे स्थान प्राप्त करून आहे.(Kalyan Mela Sangh)
 
“साधारण १०० वर्षांपूर्वी कल्याणातील हिंदूंनी सर्व जातीपाती विसरून हिंदू धर्मासाठी आपले आराध्य गणपती देवतेसाठी अभेद्य अशी एकजूट दाखवली..आपल्या परंपरे प्प्रमाणे गणेशोत्सव साजरा करणाऱ्या हिंदूंना त्याकाळी विनाकारण अडवणूक करणाऱ्या धर्मांध जिहाद्यांना हिंदुनी चांगली अद्दल घडवली त्यांतर पुन्हा त्यांची हिम्मत झाली नाही आपल्या गणेशोत्स्वात विघ्न निर्माण करण्याची.म्हणूनच कल्याण मधील मेळा संघाचे हिंदुत्वाच्या दृष्टीने एक वेगळेच महत्व आहे.(Kalyan Mela Sangh)
 
- पराग तेली,कार्याध्यक्ष- मेळा संघ गणपती
 
 




संबंधित मजकूर