'डीजी यात्रा'चा विस्तार होणार! आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी प्रमुख विमानतळांवर नवी चाचणी; कशी काम करणार सुविधा? जाणून घ्या

 
Digi Yatra International
 
नवी दिल्ली (Digi Yatra International) : देशांतर्गत विमान प्रवाशांसाठी वापरली जाणारी 'डीजी यात्रा सेवा आता आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठीही विस्तारण्याच्या तयारीत आहे. सरकारकडून दिल्ली, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद आणि कोची यांसारख्या प्रमुख विमानतळांवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी 'डीजी यात्रा'ची चाचणी घेण्याची तयारी सुरू आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ही सुविधा भारतातून परदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी म्हणजेच आंतरराष्ट्रीय निर्गमनसाठी वापरण्याचा विचार आहे.

'डीजी यात्रा' कशी काम करते?
 
'डीजी यात्रा' ही बायोमेट्रिक आणि डिजिटल ओळख प्रणालीवर आधारित सुविधा आहे. देशांतर्गत प्रवास करताना प्रवाशांना विमानतळाच्या प्रवेशद्वारावर वारंवार तिकीट किंवा ओळखपत्र दाखवण्याची गरज कमी होते. चेहरा ओळख तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रवाशाची ओळख पडताळली जाते आणि त्यानंतर विमानतळाच्या विविध टप्प्यांवर प्रक्रिया केली जाते.
 
आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मात्र प्रक्रियेत काही बदल असतील. यासाठी ई-पासपोर्ट महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. प्रवाशाला आपल्या ई-पासपोर्टचा स्कॅन करावा लागेल. स्मार्टफोनमधील NFC (Near Field Communication) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पासपोर्टमध्ये असलेली चिप वाचली जाईल. त्यानंतर पासपोर्टवरील फोटो आणि प्रवाशाच्या सेल्फीची पडताळणी केली जाऊ शकते. (Digi Yatra International)

प्रवाशांना काय फायदा होणार?
 
'डीजी यात्रा'चा सर्वात मोठा फायदा म्हणजे विमानतळावरील प्रक्रिया अधिक वेगवान आणि संपर्करहित होण्याची शक्यता आहे. टर्मिनलमध्ये प्रवेश, सुरक्षा तपासणी आणि बोर्डिंग गेटपर्यंतच्या काही प्रक्रियांमध्ये कागदपत्रांची वारंवार तपासणी कमी होऊ शकते. त्यामुळे रांगा आणि प्रतीक्षा वेळ कमी करण्यास मदत होऊ शकते.
 
मात्र, सुरुवातीच्या टप्प्यात इमिग्रेशन प्रक्रिया 'डीजी यात्रा'शी पूर्णपणे जोडली जाणार नाही. म्हणजेच परदेशात जाणाऱ्या प्रवाशांना इमिग्रेशनची आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावीच लागेल. (Digi Yatra International)
 
कोणत्या विमानतळांवर चाचणी?
 
आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी 'डीजी यात्रा'चा विस्तार टप्प्याटप्प्याने करण्याचा विचार आहे. दिल्ली आणि मुंबईसह बंगळुरू, हैदराबाद आणि कोची यांसारख्या प्रमुख विमानतळांवर याची चाचणी होण्याची शक्यता आहे.
 
यापूर्वी बंगळुरू विमानतळावर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी बायोमेट्रिक आधारित संपर्करहित प्रवासाची तांत्रिक चाचणी करण्यात आली आहे. (Digi Yatra International)
 
भविष्यात 'डीजी यात्रा'ला इमिग्रेशन आणि सीमा तपासणी प्रक्रियेशी जोडण्याचीही योजना आहे. मात्र, त्यासाठी तांत्रिक व्यवस्था, सुरक्षा आणि संबंधित नियमांमध्ये आवश्यक बदल करावे लागणार आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी 'डीजी यात्रा'चा पूर्ण विस्तार टप्प्याटप्प्याने होण्याची शक्यता आहे. (Digi Yatra International)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर