पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्धाच्या वाटेवर? पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर हवाई हल्ले; २८ नागरिकांना ठार केल्याचा दावा

 
 Pakistan Afghanistan Airstrikes
 
काबूल (Pakistan Afghanistan Airstrikes) : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. सोमवार, दि. २१ सप्टेंबर रोजी पूर्व अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानकडून हवाई हल्ले करण्यात आले. या हल्ल्यात जवळपास २८ नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याचे वृत्त आहे.
 
पाकिस्तानच्या सूचना मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने अफगाणिस्तानातील तीन ठिकाणांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये २८ दहशतवादी ठार झाल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. (Pakistan Afghanistan Airstrikes)
 
पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, अफगाणिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देत आहे. हे दहशतवादी सीमाभागातून बेकायदेशीररीत्या पाकिस्तानमध्ये घुसखोरी करत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. मात्र, अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने पाकिस्तानचे हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
 
पाकिस्तानच्या हवाई कारवाईच्या काही दिवस आधी उत्तर-पश्चिम पाकिस्तानमध्ये एका पोलीस केंद्रावर मोठा हल्ला झाला होता. या हल्ल्यात किमान १६ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर पाकिस्तानने अफगाणिस्तानातील दहशतवादी कारवायांविरोधात कारवाई करण्याच्या पार्श्वभूमीवर हे हवाई हल्ले केल्याचा दावा केला जात आहे.
 
तालिबान सरकारचे उपप्रवक्ते हमदुल्ला फितरत यांनी पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याबाबत ‘एक्स’वर पोस्ट करत माहिती दिली. पाकिस्तानच्या या हल्ल्यात कुनार प्रांतातील एका घराला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. (Pakistan Afghanistan Airstrikes)
 
यापूर्वीही पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये संघर्ष पेटला होता. मार्च २०२६ मध्ये पाकिस्तानने काबूलवर हल्ला केला होता. या हल्ल्यात सुमारे ४०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
 
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संबंध २०२६ मध्ये अनेकदा तणावपूर्ण झाले आहेत. मार्चनंतर दोन्ही देशांमध्ये सीमेवर संघर्ष वाढला होता आणि पाकिस्तानकडून अफगाणिस्तानातील लक्ष्यांवर हवाई कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे सोमवारच्या ताज्या हवाई हल्ल्यांनंतर दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Pakistan Afghanistan Airstrikes)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर