नवी दिल्ली (PM Modi SCO Speech) : बिश्केक येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) २६व्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रादेशिक सुरक्षा, दहशतवाद, शांतता, कनेक्टिव्हिटी आणि विकासाबाबत भारताची भूमिका स्पष्ट केली. विशेष म्हणजे, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या उपस्थितीत मोदींनी दहशतवादाच्या मुद्द्यावर ‘दुटप्पी धोरणा’ला स्थान नसल्याचे स्पष्ट केले.
SCO शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी मांडलेले पाच महत्त्वाचे संदेश कोणते? जाणून घेऊया...
१. दहशतवादाविरोधात ‘झिरो टॉलरन्स’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाला मानवतेसमोरील गंभीर धोका असल्याचे म्हटले. केवळ दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर देणे पुरेसे नसून, दहशतवादी वित्तपुरवठा, भरती, कट्टरतावाद आणि दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रय देणारी संपूर्ण परिसंस्था उद्ध्वस्त करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. (PM Modi SCO Speech)
दहशतवादाविरोधात कोणतेही दुटप्पी धोरण असता कामा नये, असेही मोदी यांनी स्पष्ट केले.
दहशतवादाचा वापर धोरणात्मक साधन म्हणून करणाऱ्या तसेच दहशतवाद्यांना आश्रय किंवा समर्थन देणाऱ्या देशांना स्पष्ट संदेश देण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी SCO सदस्य देशांना केले.
दहशतवाद कधीही कोणासाठीही ‘स्ट्रॅटेजिक अॅसेट’ ठरू शकत नाही, असा स्पष्ट संदेश मोदी यांनी आपल्या भाषणातून दिला. (PM Modi SCO Speech)
३. युद्ध नव्हे, संवाद आणि कूटनीती
सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे तसेच अमेरिका-इराण संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी युद्धाच्या माध्यमातून संघर्ष सोडवणे हा योग्य मार्ग नसल्याचे सांगितले. वाद आणि संघर्षांचा तोडगा संवाद आणि कूटनीतीच्या माध्यमातून काढला पाहिजे, अशी भारताची भूमिका त्यांनी पुन्हा स्पष्ट केली. (PM Modi SCO Speech)
४. ‘Security, Connectivity आणि Opportunity’वर भर
SCO संदर्भातील भारताच्या दृष्टीकोनाचे तीन प्रमुख आधारस्तंभ पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. यामध्ये Security (सुरक्षा), Connectivity (कनेक्टिव्हिटी) आणि Opportunity (संधी) यांचा समावेश आहे.
सुरक्षा (Security): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी SCO देशांसाठी सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचे अधोरेखित केले. दहशतवाद, कट्टरतावाद आणि प्रादेशिक अस्थिरतेविरोधात सर्व देशांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. (PM Modi SCO Speech)
कनेक्टिव्हिटी (Connectivity): व्यापार आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी देशांदरम्यान मजबूत कनेक्टिव्हिटी आवश्यक आहे. भारत चाबहार पोर्ट आणि आंतरराष्ट्रीय नॉर्थ-साउथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉरसारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून जागतिक व्यापार वाढवण्यावर भर देत आहे.
संधी (Opportunity): SCO च्या माध्यमातून सदस्य देशांमध्ये व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि विकासाच्या नव्या संधी निर्माण करण्यावर भारताचा भर आहे. सुरक्षा, कनेक्टिव्हिटी आणि संधी या तीनही क्षेत्रांतील सहकार्याचे ठोस परिणाम दिसायला हवेत, असे मोदी यांनी स्पष्ट केले. (PM Modi SCO Speech)
५. व्यापार आणि कनेक्टिव्हिटीसोबत सार्वभौमत्वाचा आदर
भारत बाजारपेठांना जोडणाऱ्या, व्यापाराला चालना देणाऱ्या आणि विकासाच्या नव्या संधी निर्माण करणाऱ्या कनेक्टिव्हिटी उपक्रमांचे समर्थन करतो. भारताचा जागतिक व्यापार वाढवण्यासाठी आम्ही चाबहार पोर्ट आणि आंतरराष्ट्रीय नॉर्थ-साउथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉरसारख्या प्रकल्पांवर काम करत आहोत. मात्र, अशा प्रकल्पांमध्ये सर्व देशांच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर केला गेला पाहिजे, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. (PM Modi SCO Speech)
SCO शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरोधातील कठोर भूमिका मांडण्यासोबतच संवाद, कूटनीती, आर्थिक सहकार्य आणि कनेक्टिव्हिटीवरही भारताचा भर स्पष्ट केला. सुरक्षा, विकास आणि परस्पर सहकार्याच्या माध्यमातून SCO अधिक प्रभावी करण्याचा भारताचा दृष्टिकोन त्यांच्या भाषणातून अधोरेखित झाला. (PM Modi SCO Speech)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.