मुंबई (Naigaon Ganpati Mandal Police Notice) : परळ-चिंचपोकळी परिसरात ईदनिमित्त निघालेल्या मिरवणुकीदरम्यान बुधवार, दि. २६ ऑगस्ट रोजी रात्री दोन गटांत तुफान राडा झाला. परळच्या लक्ष्मी कॉटेज परिसरात ईद साजरी करून परतणाऱ्या काही धर्मांध मुस्लिमांनी हिंदुबहुल भागात घोषणाबाजी केल्याने परिसरातील वातावरण चिघळल्याचे समोर आले होते. तेव्हा धर्मांधांकडून गणेशोत्सव मंडळ आणि गणेश मूर्तीला हानी पोहोचवण्याबाबत धमकी देण्याचेही निदर्शनास आले होते. याप्रकरणी आता नायगाव परिसरातील गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांना भोईवाडा पोलीस ठाण्याकडून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम ३५(३) अंतर्गत नोटीस बजावण्यात आल्याचे समोर आले आहे. दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी दाखल झालेल्या एका गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने तथ्य आणि परिस्थिती जाणून घेण्यासाठी ही नोटीस पाठवण्यात आल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.(Naigaon Ganpati Mandal Police Notice)
बजावण्यात आलेल्या नोटीसमध्ये नमूद केल्यानुसार, संबंधित कार्यकर्त्यांना मंगळवार, दि. १ सप्टेंबर रोजी सकाळी ११:०० वाजता भोईवाडा पोलीस ठाण्यात आवश्यक पूर्वपरवानगीसह चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. तसेच, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम ३५(४) अंतर्गत कार्यकर्त्यांना काही महत्त्वाच्या अटी व निर्देशांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये प्रकरणातील पुराव्यांशी कोणतीही छेडछाड केली जाणार नाही, प्रकरणाची वस्तुस्थिती माहित असलेल्या कोणत्याही व्यक्तीला अथवा साक्षीदाराला न्यायालयापासून किंवा पोलिसांपासून तथ्ये लपवण्यासाठी कोणतीही धमकी, प्रलोभन अथवा वचन दिले जाणार नाही, तपासादरम्यान सर्व आवश्यक कागदपत्रे व साहित्य पोलिसांसमोर सादर करावे लागेल आणि तपासाच्या हेतूने कोणतीही माहिती न लपवता सत्य उघड करावे लागेल, भविष्यात कोणताही गुन्हा केला जाणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल, आवश्यकतेनुसार व निर्देशानुसार पोलिसांसमोर आणि न्यायालयासमोर हजर राहावे लागेल, इ. अशी सूचना देण्यात आल्या आहेत.(Naigaon Ganpati Mandal Police Notice)
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या या अटींचे पालन न केल्यास किंवा चौकशीला हजर न राहिल्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम ३५(६) अंतर्गत संबंधितांवर अटकेची कारवाई केली जाऊ शकते, असा स्पष्ट इशाराही भोईवाडा पोलिसांनी या नोटीसद्वारे दिला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कार्यकर्त्यांना अशा प्रकारे बजावण्यात आलेल्या नोटीसमुळे परळ-चिंचपोकळी परिसरातील गणपती मंडळ कार्यकर्त्यांम चर्चांना उधाण आले आहे.(Naigaon Ganpati Mandal Police Notice)
आमच्या घरांसमोर येऊन जिहादींकडून दादागिरी, गुंडागिरी करत घोषणा दिल्या जातील, हिंदूंना घाबरवण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर अशा वेळी हिंदू आत्मरक्षणासाठी प्रतिकार करणारच. स्वतःचा तसेच आपल्या माता-भगिनी आणि कुटुंबाच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरणारच. अशावेळी त्यांच्यावरच गुन्हे दाखल करून पोलिसांकडून नोटिसा दिल्या जात असतील तर हे गंभीर आहे. हिंदूंवर होणारा हा अन्याय असून विश्व हिंदू परिषद सदैव हिंदूंच्या पाठीशी ठामपणे उभी राहील.(Naigaon Ganpati Mandal Police Notice)
- राजीव चौबे, विभाग मंत्री (मुंबई शहर), विश्व हिंदू परिषद
परळ प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भोईवाडा पोलिसांनी एका हिंदू मुलाला अक्षय शिरसागर यांना कलम ३५(३) ची नोटीस बजावली आहे. हिंदू समाज किंवा आमचे कार्यकर्ते अन्यायाविरोधात आवाज उठवतात, तेव्हा कार्यकर्त्यांनाच एकप्रकारे टार्गेट करणे चुकीचे आहे. आम्ही कायद्याचा आदर करतो आणि तपासाला देखील सहकार्य करू; पण कायदेशीर प्रक्रियेच्या नावाखाली जर कार्यकर्त्यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न झाला, तर विश्व हिंदू परिषद शांत बसणार नाही. पोलिसांनी एकतर्फी कारवाई न करता सत्य समोर आणावे, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल."(Naigaon Ganpati Mandal Police Notice)
- रोहित नावजी माने, सह मंत्री, परळ जिल्हा, विश्व हिंदू परिषद
अन्यायाविरोधात आवाज उठवणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. हिंदू समाजाच्या प्रश्नांसाठी किंवा अन्यायाविरोधात भूमिका मांडणाऱ्या कार्यकर्त्यांनाच वारंवार लक्ष्य करून त्यांच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल, तर हा गंभीर विषय आहे. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, आम्ही कायद्याचा आणि पोलिसांच्या तपास प्रक्रियेचा पूर्ण आदर करतो. कायदेशीर चौकशी असेल तर आम्ही निश्चितच सहकार्य करू. पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निष्पक्षपणे तपास करून सत्य समोर आणावे, हीच आमची अपेक्षा आहे. अन्याय कोणावरही झाला तरी त्याविरोधात आवाज उठवणे ही आमची भूमिका होती, आहे आणि पुढेही राहील. कार्यकर्त्यांना लक्ष्य करून दबावाचे राजकारण करण्याचा प्रयत्न झाला, तर आम्ही लोकशाही मार्गाने आणि कायदेशीर चौकटीत त्याचा ठामपणे विरोध करू.(Naigaon Ganpati Mandal Police Notice)
- यशवंत पोळ, खजिनदार, राजारामवाडी व संलग्न परिसर सार्वजनिक उत्सव मंडळ
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक