मुंबई, (Mumbai Airport Unauthorized Mosque): मुंबई विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या जागेवर अनधिकृतपणे मशीद उभारण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारी विमानतळ परिसरातील संबंधित जागेची पाहणी करून प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी अदानी समूहाचे अधिकारी, मुंबई महापालिका आणि एमएमआरडीएचे अधिकारी तसेच बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.(Mumbai Airport Unauthorized Mosque)
दरम्यान, मागच्या १० वर्षांपासून याठिकाणी ही मशीद अस्तित्वात आल्याचे समजते. विमानतळाची जमीन अतिक्रमणाच्या विळख्यात कशी गेली? या जागेवर अनधिकृत बांधकामाला वीज आणि पाणीपुरवठा कसा मिळाला? वातानुकूलन यंत्रणा आणि विद्युत उपकरणे बसविण्याची परवानगी कोणी दिली? असे सवाल किरीट सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केले.(Mumbai Airport Unauthorized Mosque)
"विमानतळाची जागा तातडीने ताब्यात घ्या. अनधिकृतपणे उभारण्यात आलेली मशीद हटवून ही जागा सील करण्यात यावी. तसेच या प्रकाराला पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी," अशी मागणी सोमय्या यांनी केली.(Mumbai Airport Unauthorized Mosque)
या जागेवर ‘लँड जिहाद’ आणि लँड माफियांच्या माध्यमातून अतिक्रमण करण्यात आले असून बांगलादेशी घुसखोरांनी विमानतळाची जमीन ताब्यात घेतल्याचा दावा सोमय्या यांनी केला. मराठी मुंबईला मुस्लिम मुंबई बनविण्याचे षडयंत्र यशस्वी होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, पाहणीनंतर सोमय्या यांनी सहार पोलीस ठाण्यात भेट देऊन या प्रकाराची माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज चाळके यांच्याशी त्यांनी या प्रकरणाबाबत चर्चा केली. विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने या प्रकरणाची चौकशी करून अनधिकृत बांधकामावर तातडीने कारवाई करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.(Mumbai Airport Unauthorized Mosque)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....