दिसपुर (Kamala Trust Assam Flood Relief) : आसाममध्ये पूराच्या संकटाने जनजीवन विस्कळीत झाले असताना, देशभरातून मदतीचे हात पुढे येत आहेत. घरदार, संसारोपयोगी वस्तू आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू गमावलेल्या पूरग्रस्त कुटुंबांना दिलासा देण्यासाठी कमला अंकीबाई घमंडीराम गोवाणी ट्रस्टकडून सातत्याने मदतकार्य सुरू आहे. केवळ मदतीची घोषणा न करता ट्रस्टचे स्वयंसेवक थेट पूरग्रस्त भागात पोहोचून आवश्यक साहित्याचे वितरण करत आहेत.
ट्रस्टच्या ‘कमला विथ आसाम’ या उपक्रमांतर्गत पूरबाधित कुटुंबांना दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंची मदत दिली जात आहे. ट्रस्टच्या विश्वस्त निदर्शना गोवाणी यांच्या नेतृत्वाखाली हे मदतकार्य राबविण्यात येत असून, जोरहाट आणि शिवसागर या जिल्हांसह विविध पूरग्रस्त भागांमध्ये मदत साहित्य पोहोचविण्यात येत आहे. (Kamala Trust Assam Flood Relief)
पूरग्रस्त कुटुंबांसाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत
पूर ओसरल्यानंतरही अनेक कुटुंबांसमोर दैनंदिन जीवन पुन्हा उभे करण्याचे मोठे आव्हान आहे. ही गरज लक्षात घेऊन ट्रस्टकडून तयार करण्यात आलेल्या मदत किटमध्ये केवळ अन्नधान्यापुरते साहित्य न देता घरगुती वापराच्या अनेक आवश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.
या किटमध्ये ताट, ग्लास, स्वयंपाकाची भांडी, कढई, चमचे, सॅनिटरी पॅड्स, मेणबत्त्या, माचिस, डासांपासून संरक्षणासाठी आवश्यक साहित्य तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. त्यामुळे पूरामुळे विस्कळीत झालेल्या कुटुंबांना दैनंदिन गरजा भागविण्यासाठी काही प्रमाणात आधार मिळत आहे. (Kamala Trust Assam Flood Relief)
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची भेट
आसाममधील मदतकार्याचा आढावा घेत असताना निदर्शना गोवाणी यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची भेट घेतली. यावेळी कमला ट्रस्टकडून राबविण्यात येत असलेल्या मदत आणि सेवा उपक्रमांची माहिती देण्यात आली.
ट्रस्टकडून मुख्यमंत्री मदत निधीलाही सहाय्य करण्यात आले आहे. आपत्तीच्या काळात तातडीची मदत करण्यासोबतच पुढील काळात पुनर्बांधणी आणि पुनर्वसनाच्या कामातही योगदान देण्याची ट्रस्टची भूमिका आहे. (Kamala Trust Assam Flood Relief)
या मदतकार्याबाबत बोलताना कमला अंकीबाई घमंडीराम गोवाणी ट्रस्टच्या विश्वस्त निदर्शना गोवाणी म्हणाल्या, “आमचे स्वयंसेवक पूरग्रस्त कुटुंबांपर्यंत आवश्यक मदत साहित्य पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रत्यक्ष मैदानात काम करत आहेत. या कठीण काळात आसामच्या जनतेसोबत उभे राहणे आणि शक्य ती सर्व मदत करणे हे आमचे प्राधान्य आहे. मदतकार्य ही केवळ पहिली पायरी आहे. परिस्थिती सुधारल्यानंतर आवश्यक तेथे पुनर्बांधणी आणि पुनर्वसनासाठीही कमला ट्रस्ट पुढे येईल.” (Kamala Trust Assam Flood Relief)
आपत्तीच्या काळात प्रशासन आणि सामाजिक संस्थांसोबत नागरिकांचा सहभागही महत्त्वाचा असतो. त्यामुळे कमला ट्रस्टने नागरिकांनाही आसाममधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. सामूहिक सहभागातून प्रभावित कुटुंबांना आवश्यक मदतीचा हात देता येईल, असा संदेश ट्रस्टकडून देण्यात आला आहे.
आसाममधील पूर परिस्थितीचा सातत्याने आढावा घेऊन ज्या भागांना अधिक मदतीची गरज आहे, तेथे आवश्यक सहाय्य पोहोचविण्याचा ट्रस्टचा प्रयत्न राहणार आहे. संकटाच्या काळात केवळ सहानुभूती व्यक्त न करता प्रत्यक्ष मदतीसाठी मैदानात उतरण्याचा ‘कमला विथ आसाम’ उपक्रमाचा प्रयत्न पूरग्रस्तांसाठी महत्त्वाचा आधार ठरत आहे. (Kamala Trust Assam Flood Relief)