ठाणे,(Eknath Shinde Shiv Sena State Chiefs Meeting) : शिवसेना हा सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी लढणारा पक्ष असून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लोककल्याणकारी कामांच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिवसेना पोहोचवावी, असे आवाहन शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या सार्वजनिक सेवेच्या निमित्ताने शिवसेना देशातील २५ राज्यांत रुग्णवाहिका देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.(Eknath Shinde Shiv Sena State Chiefs Meeting)
नवी दिल्ली येथे विविध राज्यांच्या शिवसेना राज्यप्रमुखांच्या आढावा बैठकीत शिंदे बोलत होते. यावेळी राष्ट्रीय सचिव कॅप्टन अभिजीत अडसूळ यांच्यासह १५ राज्यांतील राज्यप्रमुख आणि वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.(Eknath Shinde Shiv Sena State Chiefs Meeting)
शिक्षण, क्रीडा, रोजगार, महिला, आरोग्य, पाणी, रस्ते आणि कृषी या विषयांवर स्थानिक पातळीवर प्रभावीपणे काम करण्याच्या सूचना शिंदे यांनी दिल्या. जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी गरज पडल्यास ‘शिवसेना स्टाईल’ने आंदोलने उभारण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच पिण्याचे पाणी, रस्ते, आरोग्य सेवा, घनकचरा व्यवस्थापन, शाळांची दुरुस्ती आणि स्वच्छतागृहांसारख्या नागरी प्रश्नांवर पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पुढाकार घ्यावा, असे सांगितले.(Eknath Shinde Shiv Sena State Chiefs Meeting)
पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी सर्व राज्यांमध्ये पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तातडीने पूर्ण करण्याबरोबरच महिला आघाडी, युवासेना आणि अन्य संघटनांच्या नियुक्त्यांवर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या. सदस्य नोंदणी अभियानाच्या माध्यमातून पक्ष गावागावात आणि घराघरात पोहोचवण्याचे आवाहनही करण्यात आले.(Eknath Shinde Shiv Sena State Chiefs Meeting)
प्रत्येक राज्यप्रमुखाने आपल्या राज्यातील राजकीय-सामाजिक परिस्थिती आणि आगामी निवडणुका लक्षात घेऊन दोन महिन्यांत ठोस कृती आराखडा सादर करावा, असे शिंदे यांनी सांगितले. युवकांशी संपर्क वाढवण्यासाठी विविध राज्यांत राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याचे निर्देशही देण्यात आले.(Eknath Shinde Shiv Sena State Chiefs Meeting)
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात रक्तदान, आरोग्य शिबिरे, रोजगार मेळावे तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘पदाधिकारी केवळ राजकारणासाठी नव्हे, तर समाजकारणासाठी काम करतात. बूथ स्तरापर्यंत पक्ष मजबूत करून जनतेच्या सुख-दुःखात धावून जाणे हेच आपले ध्येय आहे,’ असे शिंदे यांनी स्पष्ट केले.(Eknath Shinde Shiv Sena State Chiefs Meeting)