पुणे (38th Pune Festival): कलेला भाषा, प्रांत यांच्या सीमा नसतात. संस्कृतीला भाषा नसते आणि संगीताला भेद नसतो. आपण सर्वजण मिळून कला संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा हा दीप पुढे नेऊया, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पुणे येथे केले. ३८ व्या पुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.(38th Pune Festival)
यावेळी उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, राज्यपाल जिष्णूदेव वर्मा, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, खासदार हेमा मालिनी, खासदार मेधा कुलकर्णी, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पुणे फेस्टिव्हलच्या चेअरपर्सन मीरा कलमाडी, पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.(38th Pune Festival)
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, "पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून हीच भावना जगभर पोहोचू दे. पुण्याची सांस्कृतिक परंपरा अधिक समृद्ध होऊ दे. महाराष्ट्राच्या कला परंपरेचा गौरव अधिक वाढू दे. नव्या पिढीला आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटू दे," अशी प्रार्थना त्यांनी केली.(38th Pune Festival)
त्या पुढे म्हणाल्या की, "अजितदादा दोन वर्षांपूर्वी पुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटनाला आले होते. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम करताना दादांनी पुण्याच्या विकासाबरोबर पुण्याची सांस्कृतिक ओळख जपण्याला नेहमीच महत्व दिले त्यामुळे हा क्षण माझ्यासाठी भावनिक आहे. पुणे ही केवळ महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी नाही तर विचार, शिक्षण, साहित्य, संगीत, नाटक, कला, क्रीडा आणि सामाजिक चळवळीची समृद्ध परंपरा जपणारे शहर आहे. त्यामुळे पुण्याच्या भूमीवर होणाऱ्या पुणे फेस्टिव्हलला एक वेगळेच महत्त्व आहे. हा केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नाही तर पुण्याच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि पुणेकरांच्या उत्साहाचा उत्सव आहे."(38th Pune Festival)
कला, संस्कृतीला आधुनिकतेची जोड देणे हेच ध्येय
"शासनस्तरावरही कला साहित्य संगीत आणि नाट्य या क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. आपल्या राज्याची कला आणि संस्कृती जपताना तिला आधुनिकतेची आणि विकासाची जोड देणे हे ध्येय आहे. कलाक्षेत्रात दीर्घकाळ योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे ही आपली सामाजिक आणि सांस्कृतिक जबाबदारी आहे," असेही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले. (38th Pune Festival)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....