पनवेल (Prashant Thakur Ganeshotsav Visits): गणेशोत्सवाच्या मंगलमय पर्वानिमित्त भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघातील विविध भागांना भेटी देत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह नागरिकांच्या घरगुती गणरायाचे दर्शन घेतले. पनवेल, नवीन पनवेल, कामोठे, खारघर, कळंबोली, खांदा कॉलनी तसेच ग्रामीण भागातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी देतानाच अनेक कुटुंबांच्या घरी विराजमान झालेल्या श्रीगणरायाचेही त्यांनी भक्तिभावाने दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत त्या त्या विभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Prashant Thakur Ganeshotsav Visits)
गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा, आनंद आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे. या उत्सवाच्या निमित्ताने नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या आनंदात सहभागी होण्याची संधी मिळते. सार्वजनिक मंडळांप्रमाणेच घराघरांत भक्तिभावाने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाची परंपराही आपली सामाजिक व सांस्कृतिक समृद्धी अधोरेखित करणारी असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी सांगितले. विविध गणेशोत्सव मंडळांच्या भेटीदरम्यान मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच भाविकांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे स्वागत केले. मंडळांनी आयोजित केलेल्या विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची माहिती त्यांनी जाणून घेतली. घरगुती गणपतींच्या दर्शनादरम्यान कुटुंबीयांनीही आमदार प्रशांत ठाकूर यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी गणरायाची आरती करून सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंदासाठी प्रार्थना केली.गणेशोत्सव भक्तिभाव, उत्साह, सामाजिक बांधिलकी आणि सलोख्याने साजरा व्हावा, तसेच या उत्सवाच्या माध्यमातून समाजातील एकोपा अधिक दृढ व्हावा, अशी भावना व्यक्त करत आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.(Prashant Thakur Ganeshotsav Visits)