दिल्ली विद्यापीठात आज ठरणार ‘विद्यार्थी नेता’; DUSU निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

 
DUSU Election 2026
 
नवी दिल्ली (DUSU Election 2026) : दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या (DUSU) २०२६-२७ निवडणुकीसाठी शुक्रवार, १८ सप्टेंबर रोजी मतदान पार पडले. शनिवार, १९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दिल्ली विद्यापीठाच्या नॉर्थ कॅम्पसमधील युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स स्टेडियमच्या मल्टिपर्पज हॉलमध्ये मतमोजणी सुरू आहे.
 
या निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि संयुक्त सचिव या चार केंद्रीय पदांसाठी एकूण २० उमेदवार रिंगणात आहेत. अध्यक्षपदासाठी सात, उपाध्यक्षपदासाठी पाच, तर सचिव आणि संयुक्त सचिवपदासाठी प्रत्येकी चार उमेदवार आहेत. अभाविप, एनएसयूआय तसेच AISA-SFI आघाडीने चारही केंद्रीय पदांसाठी उमेदवार दिले आहेत. (DUSU Election 2026)
 
DUSU निवडणुकीत यंदा दिल्ली विद्यापीठातील ५२ मतदान केंद्रांवर मतदान झाले. एकूण मतदानाची टक्केवारी ४०.४६ टक्के नोंदवण्यात आली. मागील वर्षी ही टक्केवारी ३९.५ टक्के होती. मतदानासाठी एकूण १ हजार ईवीएम उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
 
अध्यक्षपदासाठी प्रमुख उमेदवार
 
अध्यक्षपदाच्या लढतीत अभाविप चे यश डबास, एनएसयूआय चे विजय शंकर मीणा आणि AISA-SFI आघाडीच्या अनन्या रतुरी यांच्यासह सात उमेदवार आहेत. मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये विविध पदांवर उमेदवारांच्या आघाडीत बदल होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अंतिम निकालासाठी संपूर्ण मतमोजणी पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. (DUSU Election 2026)

२०२५ मध्ये अभाविप चे वर्चस्व
 
मागील वर्षी, म्हणजेच २०२५ च्या DUSU निवडणुकीत अभाविप ने चारपैकी तीन केंद्रीय पदांवर विजय मिळवला होता. अभाविप चे आर्यन मान यांनी अध्यक्षपद पटकावले होते. त्यांना 2८ हजार ८२१ मते मिळाली, तर एनएसयूआय च्या जोस्लिन नंदिता चौधरी यांना १२ हजार ६४५ मते मिळाली. अभाविप चे कुणाल चौधरी सचिव आणि दीपिका झा संयुक्त सचिवपदी विजयी झाले. दुसरीकडे, एनएसयूआय चे राहुल झांझला उपाध्यक्षपदी विजयी झाले.
 
२०२५ मध्ये DUSU निवडणुकीत सुमारे ३९.४ टक्के मतदान झाले होते. २०२४ मधील निवडणुकीच्या तुलनेत मतदानात वाढ झाली होती. (DUSU Election 2026)
 
सुरक्षेचा कडक बंदोबस्त
 
मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विद्यापीठ परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. दोन हजारांहून अधिक पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आल्याचे वृत्त आहे. तसेच निकाल जाहीर झाल्यानंतर विजय मिरवणुका काढण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने निर्बंध घातले आहेत.
 
DUSU निवडणुकीचा अंतिम निकाल आज जाहीर होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे अध्यक्षासह चारही केंद्रीय पदांवर कोणाची निवड होते, याकडे दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे आणि विद्यार्थी संघटनांचे लक्ष लागले आहे. (DUSU Election 2026)





मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर