तृणमूल काँग्रेसचे नाव-चिन्ह गोठले; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, ममता आणि ऋतब्रत दोन्हीं गटांना स्वतंत्र नाव-चिन्ह!


TMC Name Symbol Freeze

कोलकाता (TMC Name Symbol Freeze) : पश्चिम बंगालच्या राजकारणात तृणमूल काँग्रेसच्या पक्षनाव आणि निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना आगामी विधानसभा पोटनिवडणुकांसाठी स्वतंत्र नाव आणि निवडणूक चिन्ह मंजूर केले आहे. त्यामुळे तब्बल २८ वर्षांपासून तृणमूल काँग्रेसची ओळख असलेले ‘जोडीफूल’ हे पारंपरिक चिन्ह सध्या वापरता येणार नाही.
 

निवडणूक आयोगाच्या अंतरिम निर्णयानुसार ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गटाला ‘ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ हे नाव देण्यात आले असून, या गटाला फुटबॉल खेळाडू हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. दुसरीकडे, ऋतब्रज बॅनर्जी गटाला ‘डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस’ हे नाव आणि 'लिफाफा' हे चिन्ह देण्यात आले आहे.  (TMC Name Symbol Freeze)
 
‘जोडीफूल’ चिन्ह आणि मूळ नाव गोठवले
 

तृणमूल काँग्रेसमधील दोन गटांकडून पक्षाच्या नावावर आणि पारंपरिक निवडणूक चिन्हावर दावा करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार ‘ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ हे नाव आणि ‘जोडीफूल’ हे राखीव निवडणूक चिन्ह दोन्ही गटांना वापरण्यास मनाई केली आहे. (TMC Name Symbol Freeze)
 

हा निर्णय आगामी पश्चिम बंगाल विधानसभा पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. आयोगाने दोन्ही गटांना स्वतंत्र नाव आणि मुक्त चिन्हांची निवड करण्यास सांगितले होते. त्यानंतर दोन्ही गटांनी आपापल्या पसंतीची नावे आणि चिन्हे सादर केली.
 

पोटनिवडणुकांपूर्वी मोठा बदल
 

पश्चिम बंगालमधील नंदीग्राम आणि रेजीनगर विधानसभा मतदारसंघांमध्ये आगामी पोटनिवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी दोन्ही गटांना स्वतंत्र ओळख देण्यासाठी आयोगाने हा अंतरिम निर्णय घेतला आहे. (TMC Name Symbol Freeze)
 

दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या मूळ पक्षनावावर आणि ‘जोडीफूल’ चिन्हावर अंतिम हक्क कोणत्या गटाचा असेल, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. सध्याचा निर्णय अंतरिम स्वरूपाचा असून पक्षाच्या संघटनात्मक नियंत्रणाबाबत दोन्ही गटांचे दावे निवडणूक आयोगाकडे विचाराधीन आहेत.
 

त्यामुळे आगामी पोटनिवडणुकांमध्ये मतदारांना तृणमूल काँग्रेसच्या पारंपरिक ‘जोडीफूल’ चिन्हाऐवजी दोन वेगवेगळ्या नावांनी आणि नव्या चिन्हांसह उमेदवार पाहायला मिळणार आहेत. (TMC Name Symbol Freeze)
 

 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर