मुंबई (SNDT Women’s University Admission 2026) : एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्रात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या जुलै २०२६ सत्रासाठी विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. प्रवेशासाठी दि. सप्टेंबर २०२६ ही अंतिम मुदत असून, नियमित महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेणे शक्य नसलेल्या युवती व महिलांसाठी उच्च शिक्षण पूर्ण करण्याची ही महत्त्वपूर्ण संधी आहे. (SNDT Women’s University Admission 2026)
पदवी अभ्यासक्रमांमध्ये बी.ए., बी.कॉम., बी.एम.एस. आणि बी.ए. मास मीडिया यांचा समावेश आहे. बी.ए. व एम.ए. अभ्यासक्रमांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांमध्ये शिक्षणाची सुविधा आहे. तसेच पदव्युत्तर स्तरावर एम.कॉम., एमबीए आणि एम.ए. शिक्षणशास्त्र हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. (SNDT Women’s University Admission 2026)
बी.एम.एस. आणि एमबीए या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असून, ही परीक्षा १० ऑक्टोबर २०२६ रोजी ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या प्रवेश परीक्षेसाठी इच्छुक विद्यार्थिनींना ५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे. दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्रामार्फत राबविण्यात येणारे अभ्यासक्रम UGC-DEB मान्यताप्राप्त असून, विद्यार्थिनींना ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया, तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन, ई-पुस्तक स्वरूपातील स्वयं-अध्ययन साहित्य, ऑनलाइन समुपदेशन सत्रे, विविध अभ्यास व परीक्षा केंद्रांची सुविधा, शासकीय नियमानुसार शिष्यवृत्ती आणि रोजगाराभिमुख करिअर विकासाच्या संधी उपलब्ध आहेत. हे अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत आहेत. (SNDT Women’s University Admission 2026)
अर्ज कुठे करणार?
विद्यार्थिनींच्या मार्गदर्शनासाठी मुंबई (मुख्यालय), पुणे (उपकेंद्र) आणि चंद्रपूर-बल्लारपूर (उपकेंद्र) येथे संपर्क केंद्रे उपलब्ध आहेत. पदवी अभ्यासक्रमांसाठी https://sndtadm.dulive.ac आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी https://sndtcdoeadm.samarth.edu.in/ या संकेतस्थळांवर ऑनलाइन अर्ज करता येईल. (SNDT Women’s University Admission 2026)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....