मुंबई (Prakash Gade BJP Maharashtra Social Media Convenor) : भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्राच्या सोशल मीडिया प्रकोष्ठाच्या संयोजकपदी प्रकाश गाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीने १७ सप्टेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील नियुक्तीपत्र जारी करण्यात आले. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी नियुक्तीपत्राद्वारे दोन्ही पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.(Prakash Gade BJP Maharashtra Social Media Convenor)
पक्षाच्या संघटनात्मक नियुक्त्यांमध्ये निखिल लाटकर यांची सोशल मीडिया प्रकोष्ठाच्या सहसंयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या दोन्ही नियुक्त्या तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.(Prakash Gade BJP Maharashtra Social Media Convenor)
प्रकाश गाडे यांच्याकडे यापूर्वीही भाजपच्या सोशल मीडिया कामकाजाची जबाबदारी होती. सप्टेंबर २०२५ मधील एका प्रकरणात महाराष्ट्र काँग्रेसच्या सोशल मीडिया पोस्टविरोधात दाखल झालेल्या तक्रारीत त्यांचा उल्लेख भाजपच्या सोशल मीडिया सेलचे समन्वयक म्हणून झाला होता. नव्या नियुक्तीनंतर महाराष्ट्र भाजपच्या सोशल मीडिया प्रकोष्ठाच्या संघटनात्मक आणि डिजिटल संवादाची जबाबदारी प्रकाश गाडे यांच्याकडे राहणार आहे. पक्षाच्या अधिकृत नियुक्तीपत्रानुसार निखिल लाटकर हे सहसंयोजक म्हणून त्यांना सहकार्य करतील.(Prakash Gade BJP Maharashtra Social Media Convenor)
आजचा दिवस माझ्यासाठी ऐतिहासिक आणि अविस्मरणीय ठरला आहे. सलग तिसऱ्यांदा माझ्यावर हीच जबाबदारी सोपवली जाईल, असा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दाखवलेला हा विश्वास माझ्या पाठीवर मारलेली कौतुकाची थाप आहे. विशेष म्हणजे, आज आपल्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस आहे. या शुभमुहूर्तावरच ही घोषणा होणे, हा माझ्यासाठी दुहेरी आनंदाचा आणि कमालीचा भावूक करणारा प्रसंग आहे. पक्षाने सलग तिसऱ्यांदा माझ्या खांद्यावर सोपवलेली ही जबाबदारी मी पूर्ण निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि नेटाने पार पाडेन, हाच माझा शब्द आहे! पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि प्रदेशाध्यक्ष आदरणीय रविदादा चव्हाण यांचे मनःपूर्वक आभार!
- प्रकाश गाडे (Prakash Gade BJP Maharashtra Social Media Convenor)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.