मुंबई,(अभिनंदन परुळेकर): “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भविष्य़ाची चिंता राऊत यांनी करू नये.त्यापेक्षा आदित्य ठाकरे आणि मातोश्रीचे ग्रह कसे फिरलेत याचे आत्मचिंतन राऊत यांनी करावे.दिवे लावण्याची भारतीय परंपरा भाजप पुढे नेत आहे.मात्र दिवे विझवणे,पक्ष संपवणे,आपल्या मालकाचे करीयर उदध्वस्त करणे ही परंपरा तुमची आहे.”अशी परखड टीका भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवार दि.१८ रोजी उबाठा व खासदार संजय राऊत यांच्यावर केली.(Navnath Ban Slams Sanjay Raut)
“कोण कुणाचा घरगडी आहे हा इतिहास राज्याला माहित आहे.निवडणूक आयोग निपक्षपातीपणे काम करत आहे. तुम्ही मात्र कॉंग्रेसचे घरगडी म्हणुन काम करत आहात.लोकशाहीत जनता हा लोकशाहीचा आत्मा असतो आणि जनता ख-या शिवसेनेसोबत म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे.त्यामुळे लोकशाहीचा आत्मा एकनाथ शिंदेंच्यासोबत आहे आणि तुम्ही मात्र राहुल गांधी आणि कॉंग्रेसचे घरगडी म्हणून काम करत आहात.ममता बॅनर्जी यांच चिन्ह गोठवल्यामुळे संजय राऊत यांना पोटशुळ आला आहे.पण लोकशाहीत सर्वात मोठ जनमत असत त्यामुळे जनमत ना ममता बॅनर्जी ना उध्दव ठाकरे यांच्यासोबत होते.”असे रोखठोक मत बन यांनी राऊत यांच्या विधानावर व्यक्त केले.(Navnath Ban Slams Sanjay Raut)
“राहिला प्रश्न निवडणूक आयोगाच्या घोटाळ्याचा तर सर्वात मोठे घोटाळे बहाद्दर तुम्ही आहात.त्यामुळे तुम्ही घोटाळ्याबद्दल न बोललेल बर.तसेच दिशा सेलियन प्रकरण समोर आल्यानंतर सर्वात जास्त आनंद जनाब संजय राऊत यांना झालेला आहे.कारण राऊत जेव्हा जेलमध्ये गेले होते,तेव्हा ठाकरे कुटूंबाने त्यांना मदत केली न्हवती. तो राग राऊत यांच्या मनात आहे.आदित्य ठाकरे यांच राजकिय करीयर उध्वस्त व्हाव आणि संपूर्ण पक्ष आपल्या हाती यावा ही राऊत यांची इच्छा आहे.”असेही बन यांनी राऊत यांना सुनावले.(Navnath Ban Slams Sanjay Raut)