मुंबई : अंमली पदार्थ घेऊन जगणे हे काही जीवन नाही. 'ड्रग इज नॉट कुल, इट्स क्रुएल'. व्यसनाधीन व्यक्तीला मदत करणे म्हणजे त्याच्या जीवनात लुडबुड करणे नसून ती त्याला मदत करणे आहे. व्यसनाधीन व्यक्तीशी आपला संबंध नाही, त्याला वाटते तसे जगू द्यावे, अशी स्वार्थी भूमिका घेऊ नये. अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला मदत करण्यासाठी युवक व विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. व्यसनाधीनतेचे गंभीर आव्हान विचारात घेता त्याविरुद्ध लढा राष्ट्रव्यापी करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. (Jishnu Dev Varma Drug Awareness)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरु असलेल्या सेवा संकल्प अभियानांतर्गत राज्यपालांनी एचएसएनसी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना व्यसन मुक्तीची प्रतिज्ञा दिली. यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते मुंबई विद्यापीठाने विकसित केलेल्या 'से नो टू ड्रग्स' या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. या पोर्टलच्या माध्यमातून व्यसन मुक्ती संकल्प घेता येणार आहे तसेच त्या विषयावर जनजागृती केली जाणार आहे. (Jishnu Dev Varma Drug Awareness)
राज्यपाल जिष्णू देव वर्मा म्हणाले की, "समाजातील वाढत्या अंमली पदार्थाच्या व्यसनाधीनतेच्या समस्येला मागणी व पुरवठा अशा दोन बाजू आहेत. पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस व इतर शासकीय यंत्रणा कार्य करत आहेत. परंतू, मागणी होऊ नये याकरिता समाजात मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे. भारत ही सर्वाधिक युवा शक्ती असलेली सर्वात जुनी संस्कृती आहे. अंमली पदार्थांच्या आव्हानामुळे आज कुटुंब व समाज उद्ध्वस्त होत आहे. पूर्वी असलेली संयुक्त कुटुंब पद्धती राहिली नाही. त्यामुळे व्यसनाधीन व्यक्तीला आधार देणारी नवी व्यवस्था समाजाला निर्माण करावी लागेल." (Jishnu Dev Varma Drug Awareness)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....