अमृतसर (Punjab Police Officer Murder) : पंजाबमधील अमृतसर येथे गस्तीवर असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सब-इन्स्पेक्टर हरजित सिंह यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. या हल्ल्याची जबाबदारी ‘तहरीक-ए-तालिबान हिंदुस्थान’ या संघटनेने घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या दाव्याची अधिकृत पडताळणी होणे अद्याप बाकी आहे.
हरजित सिंह हे अमृतसर येथील गेट हकीमा पोलिस चौकीत सब-इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होते. गुरुवार, १७ सप्टेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास ते दाना मंडीजवळील भघतांवाला धान्य बाजार परिसरात मोटारसायकलवरून गस्त घालत असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. (Punjab Police Officer Murder)
VIDEO | On two unidentified motorcycle-borne men being fatally shot an assistant sub-inspector of Punjab Police at the Bhagtanwala grain market, Punjab DGP Gaurav Yadav says, "ASI Harjit Singh was murdered last night, unfortunately. So I visited the crime scene. I met his family… pic.twitter.com/G2QtbnVP9m
पोलिसांना मध्यरात्री सुमारे १ वाजता नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
सीसीटीव्ही फुटेजमधून महत्त्वाची माहिती समोर
घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर रात्री १२ वाजून ३२ मिनिटांनी एक संशयास्पद स्कूटर घटनास्थळावरून निघून गेल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांकडे केलेल्या चौकशीत हा प्रकार रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली. (Punjab Police Officer Murder)
घटनास्थळावरून एक काडतूस जप्त करण्यात आले आहे. हरजित सिंह यांच्या पाठीवर, मानेच्या खाली गोळी लागल्याची जखम आढळून आल्याची माहिती पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी दिली.
आरोपींचा शोध सुरू
या घटनेनंतर पंजाब पोलिसांनी तपासाची गती वाढवली असून, संशयित आरोपींचा शोध घेतला जात आहे. सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळावरील पुरावे आणि इतर उपलब्ध माहितीच्या आधारे हा तपास केला जात आहे.
दरम्यान, गस्तीवर असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची अशा प्रकारे हत्या झाल्याने पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. (Punjab Police Officer Murder)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.