चिमुकलीच्या वेदनेसमोर संवेदनशील झाले महसूल मंत्री!श्रीनिकाच्या उपचारासाठी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

SMA Type-2 आजाराशी झुंजणाऱ्या २ वर्षे १० महिन्यांच्या श्रीनिकाच्या पालकांची मंत्रालयात भेट! १० कोटींच्या उपचारखर्चाचे मोठे आव्हान

    17-Sep-2026
Shrinika SMA Type-2 Treatment
 
मुंबई,(Shrinika SMA Type-2 Treatment): अवघ्या सव्वा दोन वर्षांच्या श्रीनिकाच्या आयुष्यासाठी तिच्या आईवडिलांची धडपड सुरू आहे… आई शिवानी, वडील रोहित आणि काका निखिल यांनी श्रीनिकाला खांद्यावर घेऊन मंत्रालयातील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे दालन गाठले. त्यांच्यासोबत अर्थ राज्यमंत्री आशीष जयस्वाल होते. त्यांच्या हाती एक जाडजूड फाईल होते.(Shrinika SMA Type-2 Treatment)
 
श्रीनिका गोड, निरागस चिमुकली. दुर्मिळ आजाराने पीडित अजूनही ती हसत हसत दालनात उपस्थित सगळ्यांना हात हलवून प्रतिसाद देत होती. हळूच कोणाच्या तरी हाताला हलकेच पकडत होती. पुन्हा हसत होती…त्याचवेळी तिच्या आईवडिलांशी महसूल मंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. तिच्या दुर्मिळ आजाराची माहिती घेत होते. राज्यमंत्री जयस्वाल हे सोबत आणलेल्या फाईलमधून श्रीनिकासंबंधी एकेक वैद्यकीय कागदपत्र दाखवीत होते. माहिती देत होते. दोन मंत्र्यांमधील संवेदनशीलता त्यांच्याचेहऱ्यावरून दिसत होती. मुलीची प्रकृती, आजाराचे स्वरूप आणि उपचारासाठी लागणाऱ्या मोठ्या खर्चाची माहिती महसूल मंत्र्यांना दिली. काही मिनिटांच्या या भेटीत एका कुटुंबाची असहायता, एका आई-वडिलांची धडपड आणि आपल्या मुलीला आरोग्यासाठी सुरू असलेली जीवघेणी झुंज त्यांच्यासमोर होती. या परिस्थितीकडे केवळ एक प्रकरण म्हणून न पाहता माणुसकीच्या दृष्टिकोनातून मदतीचा हात देण्याची भूमिका मंत्री बावनकुळे यांनी घेतली. बावनकुळे यांनी आशीष जैस्वाल यांच्याकडून आपण कुठून मदत करू शकतो, याची चर्चा केली. सरकार, महापालिका, आरोग्य विभाग, मुख्यमंत्री सहायता निधी अशी सगळी शक्यता तपासली आणि काही अधिकाऱ्यांशी तत्काळ बोलून जलद पावले उचलण्याचे निर्देश दिले.(Shrinika SMA Type-2 Treatment)
 
श्रीनिका रामटेकची. तिच्या वडिलांचे भांड्याचे दुकान आहे. ती सर्वसाधारण मुलांप्रमाणे रांगत नसल्याने तिची तपासणी केली तेव्हा तिला दुर्मिळ SMA Type-2 (स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी) आजाराने ग्रासल्याचे निदान झाले. तिच्या आयुष्याची दोरी बळकट करण्यासाठी तिला एक इंजेक्शन टोचावे लागणार. त्याची किंमत दहा कोटी आहे. (Shrinika SMA Type-2 Treatment)
 
मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार होतील.
 
मंत्री बावनकुळे म्हणाले, “ ही संवेदनशीलतेची कसोटी आहे. एखाद्या कुटुंबाच्या आयुष्यातील सर्वात कठीण क्षणी त्यांना केवळ नियम-कायद्यांची भाषा न ऐकवता “मदतीसाठी आपण प्रयत्न करू..” समाजानेही तिला सहृदयतेने मदत केली पाहिजे.तिला आई-बाबांच्या हाताला धरून चालायचे आहे. खेळायचे आहे. हसायचे आहे. तिच्या वयाच्या इतर मुलांप्रमाणे बालपण जगायचे आहे. तिच्या या छोट्याशा इच्छेपुढे १० कोटी रुपयांचा आकडा प्रचंड आहे. पण तिच्या पालकांची आशा त्याहून मोठी आहे.(Shrinika SMA Type-2 Treatment)
 
 
 
 




संबंधित मजकूर