प्रकाश गाडे यांची भाजप महाराष्ट्राच्या सोशल मीडिया प्रकोष्ठाच्या संयोजकपदी नियुक्ती,निखिल लाटकर यांची सोशल मीडिया प्रकोष्ठाच्या सहसंयोजकपदी नियुक्ती

    17-Sep-2026
 
Prakash Gade BJP Maharashtra
 
महाराष्ट्र(Prakash Gade BJP Maharashtra): भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्राच्या सोशल मीडिया प्रकोष्ठाच्या संयोजकपदी प्रकाश गाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीने १७ सप्टेंबर रोजी याबाबतचे नियुक्तीपत्र जारी करण्यात आले.(Prakash Gade BJP Maharashtra)
 
पक्षाच्या संघटनात्मक नियुक्ती अंतर्गत निखिल लाटकर यांची सोशल मीडिया प्रकोष्ठाच्या सहसंयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही नियुक्त्या तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.(Prakash Gade BJP Maharashtra)
 
सोशल मीडिया हे पक्षाच्या जनसंपर्क आणि संवादाचे महत्त्वाचे माध्यम बनले असून, या पार्श्वभूमीवर प्रकाश गाडे यांच्यावर प्रदेशाच्या सोशल मीडिया प्रकोष्ठाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पक्षाच्या संघटनात्मक आणि प्रचारात्मक कामकाजात सोशल मीडिया प्रकोष्ठाची भूमिका प्रभावी करण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.(Prakash Gade BJP Maharashtra)
 
प्रकाश गाडे यांच्या नियुक्तीबद्दल पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात येत असून, नव्या जबाबदारीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.(Prakash Gade BJP Maharashtra)
 
 




संबंधित मजकूर