NSE च्या अँकर बुकमधून ६,७४६.१ कोटी रुपये उभे; ९८ अँकर गुंतवणूकदारांचा सहभाग

    17-Sep-2026
 
 
NSE IPO SBI Stake Sale
 
 
मुंबई(NSE IPO SBI Stake Sale): NSE च्या अँकर गुंतवणूकदार वाटपात एक वेगळाच योगायोग समोर आला आहे. SBI समूह NSE मधील स्वतःचा सुमारे १ टक्का हिस्सा विकण्यास सज्ज आहे. हा हिस्सा SBI बँक आणि SBI कॅपिटल मार्केट्समार्फत बाजारात विकला जाणार आहे. पण त्याआधीच त्याच समूहातील SBI Mutual Fund, SBI Life, SBI General आणि SBI Pension Fund यांनी अँकर गुंतवणूकदार म्हणून NSE च्या शेअर्समध्ये पैसे ओतले आहेत. ही गुंतवणूक ४०० कोटी रुपयांहून अधिक आहे. थोडक्यात, बाजारात विकण्याआधीच SBI च्या हिश्श्याला SBI समूहच गिऱ्हाईक बनला आहे.(NSE IPO SBI Stake Sale)
 
NSE ने IPO पूर्वी अँकर गुंतवणूकदारांकडून ६,७४६.१ कोटी रुपये उभे केले. ही रक्कम १५० हून अधिक मानांकित गुंतवणूकदारांकडून आली. प्रति शेअर १,७८५ रुपये दराने ३,७७,९३,७३९ शेअर्सचे वाटप झाले. यात सार्वभौम गुंतवणूक निधी, जागतिक मालमत्ता व्यवस्थापक, म्युच्युअल फंड, विमा कंपन्या आणि पर्यायी गुंतवणूक मंच सहभागी झाले. IPO गुरुवार, १७ सप्टेंबर २०२६ रोजी खुला होईल आणि सोमवार, २१ सप्टेंबर २०२६ रोजी बंद होईल.(NSE IPO SBI Stake Sale)
 
अँकर बुकमध्ये LIC, गव्हर्न्मेंट पेन्शन फंड ग्लोबल, मॉनेटरी अथॉरिटी ऑफ सिंगापूर, अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी, फिडेलिटी फंड्स, गोल्डमन सॅक्स फंड्स आणि एचएसबीसी ग्लोबल इन्व्हेस्टमेंट फंड्स सहभागी झाले. एकूण ३,७७,९३,७३९ शेअर्सपैकी १,३९,७७,५२४ शेअर्स २९ देशांतर्गत म्युच्युअल फंडांच्या ९८ स्कीम्सना मिळाले.(NSE IPO SBI Stake Sale)
 
LIC ही NSE मधील सर्वांत मोठी भागधारक आहे. तिचा हिस्सा १०.७२ टक्के आहे — विक्रीसाठी काढलेल्या एकूण हिश्श्यापेक्षाही मोठा. LIC, LIC Mutual Fund आणि LIC Pension Fund या तिघांनी मिळून अँकर बुकमध्ये ५०० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली.
 
या IPO मध्ये १२,६४,३६,६५० शेअर्सची विक्री ऑफर-फॉर-सेल पद्धतीने होणार आहे. विक्रेत्यांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्ड, अरांडा इन्व्हेस्टमेंट्स, द न्यू इंडिया अॅश्युरन्स आणि बँक ऑफ बडोदा यांचा समावेश आहे. किंमत पट्टा १,७०० ते १,७८५ रुपये आहे. किमान ८ शेअर्सची आणि नंतर ८ च्या पटीत बोली लावता येईल. शेअर्स BSE वर सूचिबद्ध होतील.(NSE IPO SBI Stake Sale)
 
अँकर बुकच्या तुलनेत सुमारे २० पट मागणी नोंदवली गेली — जवळपास १.२ लाख कोटी रुपये. २० हून अधिक परदेशी लाँग-ओन्ली फंड सहभागी झाले. FPI नी ४३ टक्के म्हणजे २,८८३ कोटी रुपये गुंतवले. २५ हून अधिक देशांतर्गत म्युच्युअल फंड आणि ११ विमा-पेन्शन कंपन्यांनी मिळून ५३ टक्के म्हणजे ३,५८८ कोटी रुपये गुंतवले.(NSE IPO SBI Stake Sale)
 
 
 
 




संबंधित मजकूर