मराठा आरक्षण कक्षासाठी जागा देणार

    17-Sep-2026   
Maratha Reservation
 
मुंबई (Maratha Reservation): कुणबी नोंदी शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेली निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती आणि मराठा आरक्षण कक्षासाठी जागा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यानुसार, नव्या प्रशासकीय इमारतीतील ऊर्जा विभागाचे कार्यालय शिंदे समितीला देण्यात येणार आहे. बुधवारी, सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. (Maratha Reservation)
मुंबईतील नवीन प्रशासकीय इमारतीच्या १२वा मजल्यावरील ऊर्जा विभागासाठी आधी राखीव असलेली ९६४.४४ चौरस फूट जागा आता मराठा आरक्षण कक्षाला देण्यात आली आहे. या नवीन जागेतून कुणबी नोंदी शोधणे आणि मराठा आरक्षणाशी संबंधित न्यायालयीन लढ्यांचे संपूर्ण कामकाज चालवले जाईल, तसेच निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती व मराठा आरक्षण कक्ष यांचे कामकाजाचा कालावधी संपल्यानंतर सदर जागेचा ताबा पूर्ववत ऊर्जा विभागाकडे राहील, असेही या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. (Maratha Reservation)




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर