जरांगे यांच्या मुंबई आंदोलनावर सरकारची भूमिका स्पष्ट;विखे पाटलांचे चर्चेचे आवाहन, भुजबळांचा आक्रमक सूर


Manoj Jarange Mumbai Protest
 
मुंबई (Manoj Jarange Mumbai Protest)  : राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकारात्मक प्रतिसाद आणि संवाद कायम असतानाही मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार कायम ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारमधील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि छगन भुजबळ यांनी जरांगे यांच्या आंदोलनाबाबत तीव्र आक्षेप घेतला आहे. (Manoj Jarange Mumbai Protest)
 
मराठा आरक्षणासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटील यांना गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील आंदोलनाचा निर्णय टाळण्याचे आवाहन केले आहे. मराठा समाजाच्या मागण्यांवर चर्चा आणि संवादातून तोडगा काढता येऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. सरकारचा आंदोलन दडपण्यासाठी बळाचा वापर करण्याचा कोणताही हेतू नसल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले. (Manoj Jarange Mumbai Protest)
 
सरकार मराठा आरक्षणाच्या प्रश्नाचा अभ्यास करणाऱ्या घटकांच्या संपर्कात असून, गरज भासल्यास मराठा समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याची तयारी कायम असल्याचे विखे पाटील यांनी म्हटले आहे. यापूर्वीही सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांवर विविध निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले.(Manoj Jarange Mumbai Protest)
 
दरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे यांच्या आंदोलनाच्या पद्धतीवर आणि वक्तव्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. जरांगे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच अन्य मंत्र्यांबाबत आक्षेपार्ह भाषा वापरणे चुकीचे असल्याचे मत भुजबळ यांनी व्यक्त केले. तसेच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. (Manoj Jarange Mumbai Protest)
 
भुजबळ यांनी सरकारकडून जरांगे यांच्या मागण्यांबाबत घेतलेल्या भूमिकेचाही उल्लेख केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ सप्टेंबर रोजी सांगितल्याप्रमाणे, जरांगे यांच्या १३ मागण्यांपैकी १२ मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. उर्वरित मागणीबाबत कायदेशीर आणि न्यायालयीन अडचणी असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि पुण्यात नागरिकांची मोठी गर्दी असताना आंदोलनामुळे नागरिकांना त्रास होऊ नये, यावर सरकारकडून भर दिला जात आहे. त्यामुळे चर्चेचा मार्ग खुला ठेवत आंदोलन मुंबईत नेण्याऐवजी तोडगा काढण्याचे आवाहन, अशी सरकारची सध्याची भूमिका दिसून येत आहे. (Manoj Jarange Mumbai Protest)
 
मात्र तरीही जरंगे यांनी चर्चेचा पर्याय नाकारत मुंबईत आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी तब्येत बिघडल्यानंतरही आक्रमक भूमिका घेतली आहे. नगरमध्ये डॉक्टरांकडून उपचार घेतल्यानंतर मनोज जरांगे यांनी गुरुवारी दुपारी 1 वाजता मुंबईकडे निघणार आहे, अशी घोषणा केली. मी 100 टक्के मुंबईला जाणार असून 18 तारखेला आझाद मैदानावर 10 वाजता पोहोचणार अशी माहितीही दिली. (Manoj Jarange Mumbai Protest)
 
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर