मुंबई,(HDFC Life InsurAI 3.0): भारतातील आघाडीच्या खासगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या HDFC Life ने आपल्या प्रमुख एआय उपक्रमाच्या तिसऱ्या पर्वात - इन्शुरएआय ३.० मध्ये - व्यवसायातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वाढता आवाका सादर केला. ‘ह्युमन एआय कोलॅबोरेशन’ (मानव-एआय सहकार्य) या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात HDFC Life च्या टीम्स आणि भागीदारांनी विकसित केलेले एआय उपाय एकत्र आणले गेले, जे ग्राहक अनुभव उंचावणे, कामकाजाचा वेळ कमी करणे, निर्णयप्रक्रिया अधिक सक्षम करणे आणि अंतर्गत प्रक्रिया अधिक स्मार्ट बनवणे या उद्देशाने विकसित करण्यात आले आहेत.(HDFC Life InsurAI 3.0)
कंपनीने आपल्या उपाय भागीदारांसह विक्री, सेवा, अंडररायटिंग, दावे आणि कामकाज या क्षेत्रांमध्ये एआय-आधारित नवोपक्रम सादर केले, ज्यातून एआय हे वैयक्तिक उपयोगापुरते मर्यादित न राहता संपूर्ण उद्योगस्तरावरील क्षमता कशी बनत आहे, हे स्पष्ट झाले. या कार्यक्रमात एकूण ३३ उद्योगस्तरीय एआय-आधारित नवोपक्रम सादर करण्यात आले. इन्शुरएआयच्या तिसऱ्या पर्वात दाखवण्यात आलेले प्रमुख विकास नऊ तंत्रज्ञान विषयांमध्ये विभागले गेले होते - व्हॉइस एआय, व्हिजन एआय, डेव्हलपर एआय, एजेंटिक एआय, सेल्स एआय, टेक इनोव्हेशन, तक्रार विश्लेषण व ग्राहक सेवा, डू-इट-युवरसेल्फ (कर्मचाऱ्यांसाठी प्रत्यक्ष सराव सत्र) आणि कर्मचारी उत्पादकता - जे कंपनीतील एआयच्या व्यापक अवलंबनाचे प्रतिबिंब आहे.(HDFC Life InsurAI 3.0)
HDFC Life चे मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Operating Officer) समीर योगीश्वर म्हणाले, “इन्शुरएआय हा HDFC Life मधील आमचा प्रमुख एआय कार्यक्रम आहे, जिथे आम्ही केवळ आमचे परिवर्तनकारी तंत्रज्ञानच नव्हे, तर उद्योगस्तरीय उत्कृष्टतेकडे नेणारे सहकार्यही सादर करतो. यंदाची आमची संकल्पना, ह्युमन एआय कोलॅबोरेशन, विचारपूर्वक निवडण्यात आली होती, कारण जेव्हा एआय आणि मानवी बुद्धिमत्ता एकत्र येतात, तेव्हा कार्यक्षमता, ग्राहक समाधान आणि परिणामकारकता कशी वाढू शकते, यावर आम्हाला भर द्यायचा होता. आमच्या टीम्स आणि भागीदारांनी असे नवोपक्रम सादर केले आहेत, ज्यामुळे आम्हाला अंतर्गत असोत किंवा बाह्य ग्राहकांसाठी असोत, अशा प्रकारच्या पहिल्यावहिल्या ऑफर देणे शक्य झाले आहे, आणि मला विश्वास आहे की येत्या काळातही HDFC Life या मार्गाने अग्रेसर राहील.”(HDFC Life InsurAI 3.0)
सादर करण्यात आलेल्या उपायांमध्ये ग्राहक सेवा, क्रॉस-सेल आणि पर्सिस्टन्सीला पाठबळ देणारे GenAI-आधारित व्हॉइस बॉट्स; निराकरण जलद करण्यासाठी तक्रार अंदाज (complaint prediction) आणि एआय-सहाय्यित प्रतिसाद मसुदा तयार करणे; एआय-आधारित फसवणूक तपासणी, चेहरा पडताळणी आणि लाइव्हनेस डिटेक्शन; आणि ऑटोमेशन व मानवी देखरेख यांचा मेळ घालणारे बायोनिक अंडररायटिंग यांचा समावेश होता. या क्षमता HDFC Life च्या टीम्सद्वारे विकसित केल्या जात असून, त्या एकसंध गव्हर्नन्स फ्रेमवर्कच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात राबवल्या जात आहेत. या एआय परिसंस्थेच्या केंद्रस्थानी आहे GALAXY 2.0 - जबाबदार एआय स्वीकारण्यासाठी HDFC Life चे एकसंध व्यासपीठ, जे संपूर्ण उद्योगात एआय क्षमता जबाबदारीने उभारण्यासाठी आणि विस्तारण्यासाठी समान पाया पुरवते.(HDFC Life InsurAI 3.0)