मुंबईतील झोपडपट्टी भागातील मागासवर्गीय महिलांसाठी विशेष उद्योजकता शिबिर; शासकीय कर्ज योजनांचे मिळणार थेट मार्गदर्शन

    17-Sep-2026   
BARTI Women Entrepreneurship Camps Mumbai
 
मुंबई(BARTI Women Entrepreneurship Camps Mumbai) : मुंबईतील झोपडपट्टी आणि आर्थिकदृष्ट्या मागास भागातील वंचित व अनुसूचित जातीच्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या वतीने मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध झोपडपट्टी बहुल भागांमध्ये ‘महिला उद्योजकता व शासनाच्या कर्ज योजना’ या विषयावर विशेष मोफत मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत टप्प्याटप्प्याने विविध प्रभागांमध्ये आयोजित केले जाणार असून, यासाठी २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्व-नोंदणी खुली करण्यात आली आहे.(BARTI Women Entrepreneurship Camps Mumbai)
 
मुंबईतील धारावी, गोवंडी, मानखुर्द, मालवणी आणि घाटकोपर यांसारख्या झोपडपट्टी आणि उपनगरीय भागांमध्ये राहणार्‍या मागासवर्गीय महिलांमध्ये प्रचंड कौशल्य असते, मात्र भांडवलाचा अभाव आणि शासकीय योजनांची माहिती नसणे यामुळे त्या पुढे येऊ शकत नाहीत. हीच अडचण दूर करण्यासाठी बार्टीने महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आणि सामाजिक न्याय विभागाच्या सहकार्याने या विशेष फिरत्या शिबिरांचे नियोजन केले आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश महिलांना केवळ घरगुती कामांपुरते मर्यादित न ठेवता, त्यांना स्वतःचे लघुउद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. ीया मार्गदर्शन शिबिरांमध्ये महिलांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी व आर्थिक योजनांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे.(BARTI Women Entrepreneurship Camps Mumbai)
 
यामध्ये प्रामुख्याने:
 
१. मुद्रा कर्ज योजना विनातारण व्यवसायासाठी मिळणार्‍या कर्जाची प्रक्रिया.
 
२. स्टँड-अप इंडिया : अनुसूचित जातीच्या महिला उद्योजकांसाठी विशेष सवलतींचे कर्ज.
 
३. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ: मागासवर्गीय महिलांसाठी असलेल्या थेट कर्ज योजना आणि भरीव अनुदान.
 
४.मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम : नवीन उद्योगांसाठी राज्य सरकारकडून मिळणारे आर्थिक साहाय्य.उद्योगाचे व्यवस्थापन आणि डिजिटल मार्केटिंगचे धडेकेवळ कर्ज मिळवून देणे एवढाच या शिबिराचा उद्देश नसून, व्यवसाय यशस्वी कसा करावा याचेही प्रशिक्षण दिले जाईल.
 
गृहउद्योग, शिवणकाम, ब्युटी पार्लर, केटरिंग, हस्तकला आणि लघुउत्पादन क्षेत्रात महिलांना कोणत्या संधी आहेत, याची माहिती तज्ज्ञांद्वारे दिली जाईल. याशिवाय, उत्पादित मालाला बाजारपेठ कशी मिळवावी, जीएसटी आणि ’उद्यम आधार’ परवाना कसा काढावा, तसेच व्हॉट्सअ‍ॅप आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून ’डिजिटल मार्केटिंग’ कशी करावी, याचे प्रात्यक्षिक या शिबिरांमध्ये दाखवले जाईल.(BARTI Women Entrepreneurship Camps Mumbai)

नोंदणी कशी करावी?
 
या शिबिरात सहभागी होण्यासाठी महिलांना कोणतीही फी द्यावी लागणार नाही. इच्छुक उमेदवारांनी आपल्या जवळच्या समाजकल्याण कार्यालयात किंवा बार्टीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन २५ सप्टेंबरपूर्वी आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. अर्जासोबत जातीचा दाखला, आधार कार्ड आणि बँक पासबुकची प्रत जोडणे गरजेचे आहे. मुंबईतील वंचित भगिनींनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन उद्योजकतेकडे पाऊल टाकावे, असे आवाहन बार्टी प्रशासनाने केले आहे.(BARTI Women Entrepreneurship Camps Mumbai)
 
 
 
 




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर