श्रद्धेय अशोकजी सिंघल यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विहिंपकडून विशेष लोगो जारी

    16-Sep-2026   
Ashok Singhal Birth Centenary
 
मुंबई (Ashok Singhal Birth Centenary): विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आणि अयोध्या रामजन्मभूमी आंदोलनाचे प्रभारी श्रद्धेय अशोक सिंघल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याची, सांस्कृतिक योगदानाची आणि विचारांची आठवण जागवण्यासाठी विशेष लोगो तयार करण्यात आला आहे. हा लोगो जारी करताना विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री बजरंग लाल बागडा यांनी सांगितले की, हा लोगो अशोक सिंघल यांच्या आध्यात्मिक संस्कारांसह हिंदू समाजाच्या गौरव-जागरणासाठी आणि भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी त्यांनी केलेल्या आजीवन समर्पणाचे प्रतीक आहे.(Ashok Singhal Birth Centenary)
लोगोवर अंकित असलेले ‘श्रद्धेय अशोक सिंघल’ हे नाव आदर आणि श्रद्धेची भावना व्यक्त करते. , तर ‘जन्मशताब्दी वर्ष १९२६–२०१५’ हा त्यांच्या जीवनकाळाचा उल्लेख करतो. २७ सप्टेंबर २०२६ रोजी त्यांच्या जन्माला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने हा लोगो जारी करण्यात आला आहे. त्यांच्या विचार, संकल्प आणि कार्याची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे माध्यम म्हणून या लोगोचा उपयोग केला जाणार आहे.(Ashok Singhal Birth Centenary)
लोगोची भगवा-केशरी पार्श्वभूमी त्याग, तपस्या, आध्यात्मिक चेतना, शौर्य आणि राष्ट्रधर्माप्रती समर्पणाचे प्रतीक आहे. लोगोभोवती असलेले सुवर्णवलय भारतीय ज्ञानपरंपरेची शाश्वतता, गौरव आणि प्रकाश दर्शवते. त्यामध्ये अंकित असलेले श्रीराम मंदिर हे श्रद्धेय अशोक सिंघल यांच्या जीवनातील प्रमुख ध्येय आणि श्रीराम जन्मभूमी आंदोलनातील त्यांच्या ऐतिहासिक योगदानाचे प्रतीक आहे. मंदिरासोबत फडकणारा भगवा ध्वज सनातन परंपरा, संघटन, त्याग आणि सांस्कृतिक स्वाभिमानाची भावना व्यक्त करतो.(Ashok Singhal Birth Centenary)
विहिंपचे केंद्रीय महामंत्री बजरंग बागडा यांनी सांगितले की, लोगोच्या मध्यभागी असलेले श्रद्धेय अशोक सिंघल यांचे शांत, तेजस्वी आणि सौम्य व्यक्तिमत्त्व त्यांच्या आध्यात्मिक संस्कारांचे, दृढ संकल्पाचे, संघटनकौशल्याचे तसेच पूज्य संतांप्रती असलेल्या श्रद्धेचे आणि हिंदू समाजाबद्दलच्या आत्मीयतेचे दर्शन घडवते. हा लोगो केवळ एक दृश्यचिन्ह नसून श्रद्धेय अशोक सिंघल यांच्या जीवनसंदेशाचे प्रतीकात्मक संकलन आहे. भारतीय संस्कृती, हिंदू समाजाचे संघटन, पूज्य संतांप्रती श्रद्धा आणि सांस्कृतिक स्वाभिमान यांसाठी त्यांचे संपूर्ण जीवन समर्पित होते. जन्मशताब्दी वर्ष हे त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्याबरोबरच सेवा, संघटन, संस्कार आणि सांस्कृतिक चेतनेचे नवे संकल्प पुढे नेण्याचेही एक महत्त्वाचे पर्व आहे.(Ashok Singhal Birth Centenary)
विश्व हिंदू परिषदेसह जगभरातील कार्यकर्ते आणि समाजातील विविध घटक जन्मशताब्दी वर्षादरम्यान या लोगोचा विविध कार्यक्रम, प्रकाशने, डिजिटल माध्यमे, स्मृती अभियान आणि जनसंपर्क उपक्रमांमध्ये वापर करणार आहेत. श्रद्धेय अशोक सिंघल यांच्याप्रती कृतज्ञ श्रद्धांजली तसेच त्यांच्या विचार आणि संकल्पांना पुढे नेण्याची प्रेरणा देणारे प्रतीक म्हणून हा लोगो कार्य करेल.(Ashok Singhal Birth Centenary)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर