मुंबई (Nitin Nabin Sunetra Pawar) : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट घेतली.(Nitin Nabin Sunetra Pawar)
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार पार्थ पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजपचे मुंबई अध्यक्ष आ. अमित साटम, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार प्रतापराव चिखलीकर, आमदार संजय बनसोडे आदी उपस्थित होते. (Nitin Nabin Sunetra Pawar)
याप्रसंगी नितीन नबीन यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. तसेच या भेटीदरम्यान राज्यातील विविध विषयांवर सविस्तर संवाद तसेच महाराष्ट्रात सुरू असलेल्या विविध विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली. (Nitin Nabin Sunetra Pawar)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....