राजपाल यादव यांना सर्वोच्च न्यायालयाचा शेवटचा इशारा; दोन आठवड्यांत २ कोटी जमा करण्याचे आदेश

 
Rajpal Yadav Supreme Court
 
नवी दिल्ली (Rajpal Yadav Supreme Court) : चेक बाऊन्स प्रकरणात अडचणीत सापडलेल्या बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव यांना सर्वोच्च न्यायालयाने अखेरची संधी दिली आहे. न्यायालयाने यादव यांना दोन आठवड्यांच्या आत सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये किमान दोन कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच उर्वरित रकमेची हमी देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
 
राजपाल यादव यांच्यावर मुरली प्रॉडक्शन्सचे मालक असलेल्या खासगी तक्रारदाराचे एकूण पाच कोटी रुपये देणे बाकी असल्याचे प्रकरण न्यायालयासमोर आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने यादव यांच्या यापूर्वीच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली. (Rajpal Yadav Supreme Court)
 
न्यायालयाने राजपाल यादव यांच्या मागील वर्तनाचा संदर्भ देत त्यांच्यावर विश्वास ठेवणे कठीण असल्याचे निरीक्षण नोंदवले. सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दांत टिप्पणी करत म्हटले की, “त्याच्या मागील वर्तनाकडे पाहता त्याच्यावर कोणी विश्वास कसा ठेवणार? तो बॉलिवूडमध्ये अभिनय आणि ड्रामा करण्यात तरबेज आहे, तेच तो न्यायालयातही करत आहे.” (Rajpal Yadav Supreme Court)

दोन आठवड्यांची अंतिम मुदत
 
राजपाल यादव यांच्या वकिलांनी न्यायालयाला आश्वासन दिले की, त्यांचे अशील पुढील दोन आठवड्यांत किमान दोन कोटी रुपये सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये जमा करतील. तसेच उर्वरित देय रकमेबाबत आवश्यक हमी दिली जाईल. (Rajpal Yadav Supreme Court)
 
हे आश्वासन लक्षात घेत सर्वोच्च न्यायालयाने यादव यांना ही अंतिम संधी दिली आहे. न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, या कालावधीत निर्धारित रक्कम जमा करणे आवश्यक आहे. (Rajpal Yadav Supreme Court)
 
अटकेपासून संरक्षण कायम
 
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने राजपाल यादव यांना अटकेपासून यापूर्वी दिलेले संरक्षण पुढील सुनावणीपर्यंत कायम ठेवले आहे. त्यामुळे सध्या त्यांना या प्रकरणात अटक केली जाणार नाही. (Rajpal Yadav Supreme Court)
 
मात्र, न्यायालयाने त्यांच्यावर आणखी एक महत्त्वाची अट घातली असून, राजपाल यादव यांना आपला पासपोर्ट न्यायालयाकडे जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी दि, ५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. (Rajpal Yadav Supreme Court)





मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर