तुकाराम मुंढेंना फोन करून नितेश राणेंचा सल्ला;‘हाजी अली ज्यूस सेंटर, बडे मियाँवर धाडी टाका’


Nitesh Rane Tukaram Mundhe
 
मुंबई,(Nitesh Rane Tukaram Mundhe): अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तथा आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभर भेसळखोरांविरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी विभागाकडून विविध ठिकाणी धाडी टाकण्यात येत असून, अनेक व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मुंढे यांना फोन करून काही विशिष्ट ठिकाणी कारवाई करण्याचा सल्ला दिल्याचे सांगितले आहे.(Nitesh Rane Tukaram Mundhe)
 
नवी मुंबईतील उलवे येथे वराह जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना नितेश राणे यांनी तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचा उल्लेख केला. “तुकाराम मुंढे इथे फिरूही शकत नाहीत, इतके चांगले मोदक आहेत,” असे म्हणत त्यांनी मुंढे यांना फोन केल्याचे सांगितले.(Nitesh Rane Tukaram Mundhe)
 
“मी तुकाराम मुंढे यांना कॉल केला की, जरा हाजी अली ज्यूस सेंटरवर धाड टाका. बडे मियाँ वगैरे या स्टॉल्सवर धाडी टाका. ते फालुदामध्ये रंग मिसळून आमच्या पोटात विष टाकण्याचे काम करत आहेत,” असा आरोप राणे यांनी केला. संबंधित खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होत असल्याचा दावा करत त्यांनी अन्न व औषध प्रशासनाने अशा ठिकाणी कारवाई करावी, असे आवाहन केले. दरम्यान, याच कार्यक्रमात राणे यांनी ‘थुंक जिहाद’चा आरोप करत मुस्लिम व्यक्तींकडून विकत घेतलेल्या अन्नपदार्थांबाबत संशय व्यक्त करत बहिष्काराचे आवाहन केले.(Nitesh Rane Tukaram Mundhe)
 
राणे यांनी उलवे परिसरातील काही दुकानांचाही उल्लेख केला. “लकी मराठा” नावाने सुरू असलेल्या दुकानांबाबत “आता त्यांचा काय कार्यक्रम करायचा ते करू,” असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.(Nitesh Rane Tukaram Mundhe)
 
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर