मुंबई : मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलनाच्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात कोणतेही विघ्न येऊ नये आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची असून, आंदोलनासंदर्भातील अर्जांवर पोलीस गुणवत्तेच्या आधारे निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.(Maratha reservation demands accepted)
अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे-पाटील मोजक्या कार्यकर्त्यांसह निघण्याच्या तयारीत असल्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही पोलिसांची जबाबदारी आहे. पोलिसांनी या संदर्भात निर्णय घेतलेला आहे. सध्या तरी त्यांचा आलेला अर्ज नाकारण्यात आला आहे. त्यांनी पुन्हा काही अर्ज केला असल्यास, त्यावर पोलीस गुणवत्तेच्या आधारे कारवाई करतील.”(Maratha reservation demands accepted)
“मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणी गणेश उत्सव हा प्रचंड मोठा सण आहे. विशेषतः हिंदूंच्या सणांमधला सगळ्यात मोठा सण म्हणून तो सार्वजनिकरीत्या साजरा केला जातो. या उत्सवात कुठलेही विघ्न येऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे,” असे मुख्यमंत्री म्हणाले. आंदोलने यापूर्वीही झाली आहेत आणि पुढेही होऊ शकतात. मात्र, सणासुदीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(Maratha reservation demands accepted)
मनोज जरांगे-पाटील यांनी केलेल्या मागण्यांबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्री म्हणाले की, “यावेळी तर त्यांनी केलेल्या सगळ्या मागण्या आम्ही मान्य केल्या आहेत. त्यांनी एकूण १३ मागण्या केल्या होत्या. त्यातल्या १२ मागण्या मान्य झाल्या आहेत. ज्या मागण्या कायदेशीर अडचणींमुळे मान्य होऊ शकत नाही, त्याबाबत न्यायालयातील प्रकरण, कायदेशीर अडचणी आणि महाधिवक्त्यांचे मत यांची माहिती त्यांना देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.(Maratha reservation demands accepted)
“जी मागणी मान्य होऊ शकत नव्हती, तिच्या संदर्भात कायद्याची काय अडचण आहे, कोर्टात केस काय आहे आणि महाधिवक्त्यांचे मत काय आहे, हे त्यांना समजून सांगण्यात आले आहे. आपण न्यायालयाच्या विरोधात गेलो, तर मराठा समाजाचे नुकसान कसे होऊ शकते, हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे,” असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांमध्ये आंदोलनाची भूमिका घेताना सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.(Maratha reservation demands accepted)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.