‘महाखनिज २.०’ प्रणालीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण! खनिजांची चोरी, गळती रोखणार; पुढील ५ वर्षांत २५ हजार कोटी महसुलाचे उद्दिष्ट

    15-Sep-2026   



मुंबई, (MahaKhanij 2.0 ) : महाराष्ट्रातील गौण खनिजांचे उत्खनन, वाहतूक, परवाना आणि देखरेख प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता व कार्यक्षमता आणण्यासाठी महसूल विभागाने तयार केलेल्या ‘महाखनिज २.०’ या अत्याधुनिक डिजिटल प्रणालीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आले.(MahaKhanij 2.0 )
 

गौण खनिजांच्या व्यवस्थापनाची पारंपरिक प्रक्रिया ही मोठ्या प्रमाणात कागदी व मानवी हस्तक्षेपाची असल्याने त्यात देखरेख ठेवताना अनेक अडचणी येत होत्या. त्यावर मात करत गौण खनिज प्रशासनाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला असून या माध्यमातून गौण खनिज प्रशासनात डिजिटल क्रांती येत आहे.(MahaKhanij 2.0 )
 

महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांनी याबद्दलचे सादरीकरण केले. यावेळी कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, सहसचिव मनीषा जयभाये, रेलटेल कंपनीचे प्रमुख विनोद अग्रवाल, कोकण सहआयुक्त रवींद्र पवार उपस्थित होते.(MahaKhanij 2.0 )
 

‘महाखनिज’ प्रणालीच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत राज्य शासनाच्या तिजोरीत सुमारे १६ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. आता ‘महाखनिज २.०’ या नवीन व प्रगत आवृत्तीच्या माध्यमातून पुढील पाच वर्षांत २५ हजार कोटी रुपयांचे महसूल संकलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.(MahaKhanij 2.0 )
 

'महाखनिज २.०' ची प्रमुख वैशिष्ट्ये

 
यापुढे प्रत्यक्ष कागदी वाहतूक परवान्याची गरज भासणार नाही. क्युआर कोड आणि बारकोड आधारित पूर्णपणे डिजिटल परवाना दिला जाईल, ज्यामुळे परवाना प्रक्रिया सुलभ व वेगवान होईल. खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जीपीएस, एएनपीआर, जीआयएस आणि जीओफेन्सिंगद्वारे रिअल-टाईम लक्ष ठेवले जाईल. वाहनाने ठरवून दिलेल्या मार्गापेक्षा वेगळा मार्ग निवडल्यास प्रणालीद्वारे तत्काळ अलर्ट संदेश मिळतील. निर्णय प्रक्रियेला गती देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि व्हिडिओ ॲनालिटिक्सचा वापर केला जाईल.(MahaKhanij 2.0 )
 

कोकण भवन येथे २४×७ नियंत्रण केंद्र

 
कोकण भवन येथे राज्यस्तरीय २४×७ नियंत्रण केंद्र उभारले जाणार आहे. या केंद्राद्वारे राज्यातील संपूर्ण खनिज परवाने, वाहनांची हालचाल व खाणींमधील हालचालींचे केंद्रीकृत निरीक्षण केले जाईल. यासाठी कोकण विभागाच्या विभागीय आयुक्तांची 'राज्य समन्वयक' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच खाण क्षेत्रांचे अचूक मॅपिंग व मूल्यांकनासाठी Drone, LiDAR, Bathymetric Survey आणि Remote Sensing यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे अवैध उत्खनन व अनधिकृत वाहतुकीवर वेसण घालता येणार आहे. नियमभंगाच्या स्वरूपानुसार दंडाची रक्कम प्रणालीद्वारे स्वयंचलितपणे निश्चित केली जाईल. ऑनलाईन पंचनामा, नोटीस व दंड वसुलीमुळे मानवी हस्तक्षेप पूर्णपणे बंद होऊन पारदर्शकता येईल.(MahaKhanij 2.0 )
 

'महाखनिज २.०' प्रणाली ही VAHAN, महाभूलेख, Land Records, DigiLocker, BPMS, CCTV आणि Weighbridge (वजनकाटे) यांसारख्या विविध शासकीय प्रणालींशी जोडली जाणार आहे. संबंधित नागरिक व व्यावसायिकांच्या तक्रारींचे जलद निरसन करण्यासाठी स्वतंत्र 'Grievance Redressal System' आणि २४×७ कॉल सेंटर (०८०६५०७०५५५) सुरू करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात Dedicated District Executive ची नेमणूक केली जाणार आहे. क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी Android आणि iOS ॲप्लिकेशन्स उपलब्ध करून देण्यात आले असून, ‘डिजिटल महाराष्ट्र’च्या दिशेने हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.(MahaKhanij 2.0 )
 

 
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर