कुंभमेळ्यातील संभाव्य वाढीव प्रवासी वाहतुकीसाठी रेल्वे सज्ज:सिंहस्थ कुंभमेळा-२०२७च्या पार्श्वभूमीवर रेल्वे पायाभूत सुविधांचे बळकटीकरण

मध्य रेल्वेकडून खेरवाडी यार्डात ट्रॅकची प्रमुख कामे पूर्ण


Kumbh Mela 2027 Railway Preparations
 
 
मुंबई, (Kumbh Mela 2027 Railway Preparations): आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा-२०२७च्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने रेल्वे पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण कामे हाती घेतली आहेत. कुंभमेळ्यादरम्यान प्रवासी वाहतुकीत होणारी संभाव्य मोठी वाढ लक्षात घेऊन सुरक्षित, सुरळीत आणि कार्यक्षम रेल्वे वाहतूक सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने ट्रॅक सुधारणा आणि पायाभूत सुविधा बळकटीकरणाची कामे नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहेत.(Kumbh Mela 2027 Railway Preparations)
 
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या पूर्वतयारीचा भाग म्हणून, दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १.१० ते ३.४० या वेळेत खेरवाडी यार्डात अप आणि डाउन मार्गावर एकत्रित ब्लॉक घेऊन ट्रॅकची प्रमुख कामे पूर्ण करण्यात आली. या कामांसाठी आधुनिक ट्रॅक मशिन्स तसेच पुरेसे कुशल मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते.(Kumbh Mela 2027 Railway Preparations)
 
ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेकडील विद्यमान क्रॉसओव्हर हटविण्याचे काम मोठ्या प्रमाणावर करण्यात आले. त्याचवेळी, भुसावळच्या दिशेकडील थिक वेब स्विच आणि क्रॉसिंग बसविण्याचे कामही हाती घेण्यात आले. या कामांमुळे संबंधित रेल्वे मार्गाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होण्यास मदत होणार आहे. उपलब्ध ब्लॉकच्या मर्यादित कालावधीत सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेच्या अभियांत्रिकी आणि परिचालन विभागांमध्ये प्रभावी समन्वय ठेवण्यात आला होता. कामे पूर्ण झाल्यानंतर रेल्वे वाहतूक तत्परतेने पूर्ववत करण्यावरही विशेष भर देण्यात आला.(Kumbh Mela 2027 Railway Preparations)
 
कुंभमेळा-२०२७च्या काळात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेची परिचालन क्षमता वाढविणे, पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि प्रवाशांची सुरक्षित व अखंडित वाहतूक सुनिश्चित करणे, हे मध्य रेल्वेच्या पूर्वतयारीतील महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.(Kumbh Mela 2027 Railway Preparations)
 
आधुनिक ट्रॅक मशिन्सचा वापर, कुशल मनुष्यबळाची नियुक्ती आणि सुनियोजित अंमलबजावणी यांच्या माध्यमातून मध्य रेल्वेने आव्हानात्मक ट्रॅक कामे सुरक्षिततेच्या निकषांचे पालन करून पूर्ण केली. सिंहस्थ कुंभमेळा-२०२७च्या पार्श्वभूमीवर रेल्वे व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मध्य रेल्वेकडून ही पायाभूत सुविधा बळकटीकरण मोहीम पुढेही सुरू राहणार आहे.(Kumbh Mela 2027 Railway Preparations)
 
 
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर