रियाध (Houthi Attack Saudi Arabia) : मध्यपूर्वेतील संघर्ष पुन्हा एकदा गंभीर वळणावर पोहोचला असून, येमेनमधील इराणसमर्थित हुती बंडखोरांनी सौदी अरेबियावर नव्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांची मालिका केली आहे. सौदी अरेबियातील महत्त्वाची तेलवाहतूक यंत्रणा आधीच हल्ल्यामुळे ठप्प असताना या नव्या हल्ल्यांमुळे जागतिक तेलपुरवठ्याबाबत चिंता आणखी वाढली आहे. या घडामोडींचा परिणाम कच्च्या तेलाच्या दरांवरही दिसून येत आहे.
सौदीतील लष्करी तळावर क्षेपणास्त्र-ड्रोन हल्ला
हुती बंडखोरांनी सोमवार, दि. १४ सप्टेंबर रोजी दक्षिण सौदी अरेबियातील खामिस मुशैत येथील लष्करी हवाई तळाला लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यात डझनभर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन वापरण्यात आल्याचे हुतींकडून सांगण्यात आले. हवाई तळावरील विमानांचे हँगर, रडार यंत्रणा, धावपट्टी आणि दारुगोळा साठवणूक केंद्रांना लक्ष्य करण्यात आल्याचे वृत्त आहे. (Houthi Attack Saudi Arabia)
हुतींनी हा हल्ला येमेनमधील त्यांच्या ठिकाणांवर सौदीकडून करण्यात आलेल्या हवाई कारवाईच्या प्रत्युत्तरात केल्याचे म्हटले आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सौदीच्या दक्षिणेकडील अनेक शहरांमध्ये आपत्कालीन इशारे जारी करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये १३ नागरिक जखमी झाल्याचे सौदी नेतृत्वाखालील आघाडीने सांगितले आहे.
पूर्व -पश्चिम तेलवाहू पाइपलाइन ठप्प
या हल्ल्यांबरोबरच सौदी अरेबियाच्या तेल क्षेत्रासमोर आणखी एक मोठे संकट निर्माण झाले आहे. देशातील पूर्व पश्चिम तेल पाइपलाइन हल्ल्यानंतर बंद आहे. ही सुमारे १ हजार २०० किलोमीटर लांबीची पाइपलाइन सौदीच्या पूर्व भागातील तेलक्षेत्रांना तांबड्या समुद्रावरील बंदरांशी जोडते. (Houthi Attack Saudi Arabia)
या मार्गामुळे सौदी अरेबियाला आखातातील अस्थिर आणि धोकादायक सागरी मार्गांना काही प्रमाणात पर्याय उपलब्ध होतो. त्यामुळे पाइपलाइन दीर्घकाळ बंद राहिल्यास सौदीच्या तेल निर्यातीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
मात्र, या पाइपलाइनवरील हल्ल्याला थेट हुतींना जबाबदार ठरवणे सध्या अचूक ठरणार नाही. Reuters आणि इतर वृत्तांनुसार, सौदीने या हल्ल्यामागे इराणसमर्थित इराकी गट असल्याचे म्हटले आहे. त्याच काळात हुतींकडून सौदीवर स्वतंत्र क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले झाले आहेत. (Houthi Attack Saudi Arabia)
जागतिक तेलपुरवठ्यावर किती परिणाम?
पूर्व पश्चिम पाइपलाइन बंद राहिल्याने जागतिक तेल बाजारात मोठी चिंता निर्माण झाली आहे.या पाइपलाइनमधील व्यत्ययामुळे जागतिक तेलपुरवठ्याच्या सुमारे चार टक्क्यांपर्यंत पुरवठ्यावर परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आसल्याचे सांगितले जाते. पाइपलाइन लवकर सुरू न झाल्यास सौदी अरेबियाच्या तेल निर्यातीसाठी उपलब्ध पर्याय आणखी मर्यादित होऊ शकतात. (Houthi Attack Saudi Arabia)
याशिवाय, आखाती प्रदेशातील जहाज वाहतुकीवरही संघर्षाचा परिणाम होत आहे. त्यामुळे तेल उत्पादक देशांकडून बाजारात नियमित पुरवठा सुरू राहील का, याकडे जगभरातील तेल बाजाराचे लक्ष लागले आहे.
भारतावरही परिणाम होण्याची शक्यता
भारत आपल्या गरजेच्या मोठ्या प्रमाणातील कच्च्या तेलासाठी आयातीवर अवलंबून आहे. त्यामुळे मध्यपूर्वेतील संघर्षामुळे जागतिक कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढल्यास त्याचा परिणाम भारतावरही होऊ शकतो. (Houthi Attack Saudi Arabia)
कच्च्या तेलाच्या दरवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर दबाव वाढू शकतो. त्याचबरोबर वाहतूक खर्च, औद्योगिक उत्पादन आणि महागाईवरही परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे सौदी अरेबियातील परिस्थितीवर भारतासह जगभरातील ऊर्जा बाजाराचे बारकाईने लक्ष आहे.(Houthi Attack Saudi Arabia)
सौदीवरील हुतींचे ताजे हल्ले आणि तेल पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांमुळे मध्यपूर्वेतील संघर्ष आणखी विस्तारण्याची भीती निर्माण झाली आहे. आखाती देश आणि इराण यांच्यात होणाऱ्या चर्चांनाही विलंब झाल्याने तणाव कमी करण्याचे राजनैतिक प्रयत्न सध्या अडचणीत आले आहेत.
आता सौदी अरेबिया या हल्ल्यांना कशा प्रकारे प्रत्युत्तर देतो आणि पूर्व पश्चिम पाइपलाइन किती लवकर पुन्हा सुरू होते, यावर पुढील परिस्थिती अवलंबून राहणार आहे. पाइपलाइनचा व्यत्यय दीर्घकाळ कायम राहिल्यास जागतिक तेल बाजारात पुरवठ्याचा ताण वाढून कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.(Houthi Attack Saudi Arabia)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.