मुंबई, (Dighi Shipbuilding Cluster) : महाराष्ट्राच्या सागरी विकासाच्या दिशेने आज एक ऐतिहासिक पाऊल पडले. रायगड जिल्ह्यातील दिघी येथे देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी महत्त्वाकांक्षी ग्रीनफिल्ड शिपबिल्डिंग क्लस्टर उभारण्यासाठी नॅशनल शिपबिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.(Dighi Shipbuilding Cluster)
या प्रसंगी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, बंदरे व परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, बिझनेस डेव्हलपमेंटचे सरव्यवस्थापक संजयकुमार सिंह, मुख्यमंत्री महोदयांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा आणि प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी उपस्थित होते. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडतर्फे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन जगमोहन, तर नॅशनल शिपबिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेडतर्फे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप पी. यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.(Dighi Shipbuilding Cluster)
दिघी येथील ग्रीनफिल्ड शिपबिल्डिंग क्लस्टरचा विस्तार सुमारे २ हजार एकरांवर करण्याचे नियोजन आहे. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड आणि मुंबई पोर्ट प्राधिकरण यांच्या संयुक्त मालकीच्या विशेष प्रयोजन वाहनाच्या माध्यमातून हा प्रकल्प विकसित केला जाणार आहे. ‘नॅशनल शिपबिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड’ या संस्थेच्या माध्यमातून प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे.(Dighi Shipbuilding Cluster)
या क्लस्टरमध्ये २.६ किलोमीटरचा जलकिनारा आणि १४ मीटर नियोजित खोली असणार आहे. प्रकल्पाची नियोजित जहाजबांधणी क्षमता तब्बल २० लाख ग्रॉस टनेज इतकी आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जहाजबांधणी आणि संबंधित सागरी उद्योग विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे. दिघी शिपबिल्डिंग क्लस्टरमध्ये एकूण सुमारे २७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. यामध्ये केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या योगदानासह अँकर शिपयार्डकडून होणाऱ्या गुंतवणुकीचा समावेश असेल.(Dighi Shipbuilding Cluster)
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड ‘अँकर शिपयार्ड’
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडची ‘अँकर शिपयार्ड’ म्हणून निवड करण्यात आली आहे. कंपनीने या प्रकल्पात सुमारे १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पातून सुमारे १५ हजार प्रत्यक्ष, तर तब्बल ७५ हजार अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे रायगडसह संपूर्ण महाराष्ट्रातील युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. जहाजबांधणी, जहाज दुरुस्ती, अभियांत्रिकी, लॉजिस्टिक्स आणि पूरक उद्योगांना या प्रकल्पाचा फायदा होऊ शकतो.(Dighi Shipbuilding Cluster)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.