दिल्लीतील तीन शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी; विद्यार्थ्यांमध्ये खळबळ, सुरक्षा यंत्रणा अलर्ट

 
Delhi School Bomb Threat
 
नवी दिल्ली (Delhi School Bomb Threat) : राजधानी दिल्लीतील तीन शाळांना मंगळवार, दि. १५ सप्टेंबर बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ई-मेल मिळाल्याने एकच खळबळ उडाली. धमकीची माहिती मिळताच संबंधित शाळांमध्ये सुरक्षा यंत्रणा तातडीने सक्रिय करण्यात आली. विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सुरक्षितपणे शाळेच्या परिसरातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पोलिस, अग्निशमन दल आणि बॉम्ब शोधक पथकांनी शाळांच्या परिसराची कसून तपासणी केली.
 
मिळालेल्या माहितीनुसार, चानक्यापुरी येथील 'ब्रिटिश स्कुल', धौला कुआन येथील 'आर्मी पब्लिक स्कूल' आणि लोधी इस्टेट येथील 'सरदार पटेल विद्यालय' या तीन शाळांना धमकीचे ई-मेल प्राप्त झाले. ई-मेलमधून शाळेच्या परिसरात बॉम्ब असल्याचा दावा करण्यात आला होता. (Delhi School Bomb Threat)
 
धमकीचा ई-मेल मिळताच शाळा प्रशासनाने विलंब न करता संबंधित यंत्रणांना माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. पोलिसांनी शाळेच्या परिसराला सुरक्षिततेच्या दृष्टीने घेराव घातला. अग्निशमन दलाची पथकेही घटनास्थळी दाखल झाली.
 
आर्मी पब्लिक स्कूल येथून सकाळी साडेअकराच्या सुमारास दिल्ली अग्निशमन दलाला संपर्क करण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. सुरक्षा पथकांनी शाळेच्या परिसराची तपासणी केल्यानंतर कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक आढळून आले नाही. (Delhi School Bomb Threat)
 
ब्रिटिश स्कूल येथेही धमकीचा ई-मेल आल्यानंतर सुरक्षा तपासणी करण्यात आली. या तपासणीतही कोणतेही स्फोटक सापडले नाही. प्राथमिक तपासानंतर संबंधित धमक्या फेक किंवा ‘होक्स थ्रेट’ असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
दरम्यान, सलग तीन शाळांना बॉम्बची धमकी मिळाल्याने पालकांमध्येही चिंता निर्माण झाली. या ई-मेलमागे कोण आहे, धमकी देण्यामागचा उद्देश काय आहे आणि तिन्ही शाळांना पाठवण्यात आलेल्या ई-मेलचा एकमेकांशी संबंध आहे का, याचा तपास दिल्ली पोलिसांकडून सुरू आहे. (Delhi School Bomb Threat)
 
दिल्लीमध्ये यापूर्वीही शाळांना अशा प्रकारच्या धमकीचे ई-मेल मिळाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक धमकी गांभीर्याने घेत सुरक्षा यंत्रणा तपासणी करत आहेत. (Delhi School Bomb Threat)





मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर