गृहमंत्री अमित शहा हे लोहपुरूष आहेत तर उध्दव ठाकरे हे घरपुरूष आहेत – नवनाथ बन

    12-Sep-2026
 
Navnath Ban
 
मुंबई : “देशाचे गृहमंत्री अमित शहा हे लोहपुरूष आहेत तर तुमचे मालक उध्दव ठाकरे हे घरपुरूष आहेत.जे घरात बसतात त्यांना सुरक्षेची गरज नसते. गृहमंत्री अमित शहांनी हिंमत दाखवली आणि काश्मीरमधील ३७० कलम हटवल. काश्मीरमधील ज्या लोकांच्या हातात दगड होते त्यांच्या हाताला काम देण्याच काम मोदी सरकारने केल.अमित शहा गृहमंत्री झाल्यापासून मुंबई सुरक्षित झाली.एकही बॉम्बस्फोट गेल्या १२ वर्षात झालेला नाही,याला अमितभाईंच कतृत्व म्हणतात.याउलट कॉंग्रेस सरकार असताना मुंबईत सातत्याने बॉम्बस्फोट होत होते.पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक अमित शहांच्या काळात झाली.”असे प्रत्युत्तर भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी खासदार संजय राऊत यांच्या आरोपावर दिले. (Navnath Ban)
 
शनिवार दि.१२ रोजी आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते. (Navnath Ban)
 
“स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर श्रध्दा ठेऊन अमित शहा काम करत आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराजांच साहित्य अमित शहा यांनी पूर्ण वाचले आहे.पण तुमची श्रध्दा ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणा-या राहुल गांधींच्या तसेच औरंगजेबच्या चरणावर आहे.अमित शहांच्या ताफ्यात कीती गाड्या आहेत यापेक्षा आपल्या पक्षात किती आमदार आहेत हे संजय राऊत यांनी मोजले पाहिजे.”असा टोला बन यांनी राऊतांना लगावला. (Navnath Ban)
 
“जनाब संजय राऊत यांच मराठवाड्याप्रती असलेल प्रेम बेगडी आणि नौटंकीबाज आहे.उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना मराठवाड्यातील शेतक-यांनी,‘आम्हाला फुटकी कवडी देखील मिळालेली नाही.’असे त्यांना तोंडावर सांगितले होते.सरकारमध्ये असताना फुटकी कवडीदेखील द्यायची नाही आणि आता मात्र बांधावर जाऊन शेतक-यांचे कैवारी आहोत हे नाटक करायचे.याची आता पोलखोल झालेली आहे. शेतक-यांना कर्जमाफी देण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. याउलट महाविकास आघाडी सरकारच्या काळात उध्दव ठाकरेंनी फसवी कर्जमाफी केली होती.मराठवाडा विकास मंडळ,मराठवाड्याचा अनुशेष असेल याबाबत तुमची भूमिका काय होती ते सर्वांना माहित आहे.”असे नवनाथ बन यांनी स्पष्ट केले. (Navnath Ban)
 
“मनोज जरांगे पाटील यांच्या ९० टक्के मागण्या मान्य झालेल्या आहेत.आताच्या काही मागण्या कोर्टात टिकतील का याबद्दल साशंका आहे.सरकारच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा एकदा विनंती आहे की, मुंबईत गणेशोत्सव येतोय त्यामुळे भाविकांना त्रास होऊ नये यासाठी त्यांनी आपल उपोषण मागे घ्याव.सरकार आपल्याशी चर्चा करायला तयार आहे.”असे आवाहन बन यांनी केले. (Navnath Ban)
 
 




संबंधित मजकूर