मिरा भाईंदर मधील ७ हजार अमराठी चालकांना मराठी भाषा प्रमाणपत्र प्रदान

    12-Sep-2026

Mira Bhayandar Marathi Language Certificates
 
मुंबई,(अभिनंदन परुळेकर) : मिरा भाईंदर मधील जवळ जवळ ७ हजार अमराठी रिक्षा टॅक्सीचालकांना मराठीभाषा प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा अभियानांतर्गत अमराठी व्यावसायिक वाहन चालकांना मराठी भाषा प्रमाणपत्र वितरण सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते. याबाबतची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या एक्स हँडलवरून शनिवार दि. १२ रोजी दिली आहे(Mira Bhayandar Marathi Language Certificates)
 
मिरा भाईंदर शिवसेना शहर प्रमुख सचिन मांजरेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून मिरा भाईंदरमधील अनेक अमराठी रिक्षा व टॅक्सीचालकांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग घेत मराठी भाषा शिकण्याची, बोलण्याची आणि तिचा सन्मान करण्याची सकारात्मक भूमिका घेतली होती.(Mira Bhayandar Marathi Language Certificates)
 
राज्यामध्ये कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ तसेच इतर विविध संस्थांनी हे अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी पुढाकार घेतला.
 
"भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती आपल्या संस्कृतीची आणि अस्मितेची ओळख आहे. अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरेशी जोडण्याचे काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे, ही आनंदाची बाब आहे. महाराष्ट्रात राहून मराठीचा सन्मान करणाऱ्या प्रत्येक बांधवाचे मनःपूर्वक अभिनंदन!" असे प्रतिपादन यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.(Mira Bhayandar Marathi Language Certificates)
 
 




संबंधित मजकूर