मुंबई (अभिनंदन परुळेकर) : Gokul Election 2026 गोकुळच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणुकीत महायुतीतील तिढा पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेला असून एकीकडे गोकुळच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असतानाच पुन्हा गोकुळ निवडणूक बिनविरोध होणार की काय याबाबत चर्चाना उधाण आले आहे.तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मात्र," निवडणूक महायुती म्हणूनच लढणार असून याबाबतचा तीढा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोडवतील." असे स्पष्ट केले आहे.गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्या वक्तव्याने पुन्हा बिनविरोधची चर्चा सुरू झाली असून या वक्तव्यास त्यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बिनविरोध निवडणुकीचा संदर्भ जोडला आहे. Gokul Election 2026
महायुतीतील आणखीन एक घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख नेते व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मात्र निवडणूक महायुती म्हणूनच लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.तर भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी महायुतीमध्ये गोकुळमध्ये देखील ,'भाजपच मोठा भाऊ 'असे वक्तव्य केले होते. त्याचा संदर्भ घेत मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की,"महायुतीत राज्यात भाजपा मोठा भाऊ आहे पण गोकुळमध्ये मोठा भाऊ राष्ट्रवादीच आहे. गोकुळ मधील महायुतीचा तिढा व्यवस्थित सुटेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच यातून मार्ग काढतील." Gokul Election 2026
"केडीसीसी बँकेत सर्व पक्षीय लोक एकत्र येऊन जशी निवडणुक बिनविरोध होऊ शकते तशा पद्धतीने आपल्याला गोकुळ मध्ये काही काम करता आले तर तसा प्रस्ताव इथल्या वरिष्ठ नेत्यांनी सुचवावा असे मला वाटते. गोकुळची निवडणूक बिनविरोध होईल की नाही हे मी सांगू शकत नाही पण तसा प्रयत्न करायला काही हरकत नाही."अशी भूमिका गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी शुक्रवार दि. ११ सप्टेंबर रोजी मांडली आहे. Gokul Election 2026
"महायुतीच्या नेत्यांनी स्पष्ट केल आहे की गोकुळ दूध संघ निवडणूक महायुती म्हणूनच लढवली जावी. तशाच पद्धतीने ती लढवली जाईल. पण ठराव धारकांच्या मेळाव्यात मी बिनविरोधाचा प्रस्ताव दिला होता."असेही शौमिका महाडिक म्हणाल्या आहेत. Gokul Election 2026
भाजपचे आमदार अमल महाडीक यांनी स्पष्ट केले आहे की,"गोकुळची निवडणूक कशी लढवायची हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुतीचे वरिष्ठ नेते ठरतील. आणि अदृश्य शक्ती बाबत ज्यांनी आरोप केले आहे त्यांनीच या शक्ती बाबतचा खुलासा करावा."
निवडणूक कार्यक्रमानुसार १५ सप्टेंबर पासून २२ सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून,२३ सप्टेबर रोजी अर्जाची छाननी व २४ सप्टेबर ते ८ ऑक्टोबर पर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे.१८ ऑक्टोबरला मतदान होणार असून १९ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. एकूण २५ जागांसाठी ठरावधारक मतदान करतील. Gokul Election 2026