डोंबिवली नागरी सहकारी बँकेची कुळगाव ( बदलापूर ) शाखा स्व-वास्तूत स्थानांतरित

    11-Sep-2026   

DNS Bank Kulgaon Branch
 
डोंबिवली (DNS Bank Kulgaon Branch): डोंबिवली नागरी सहकारी बँकेची कुळगाव शाखा नवीन विकसित आधुनिक सोयीसुविधानी सुसज्ज अशा ठाणेकर डीएनएसबी टॉवर मध्ये नुकतीच पुन्हा स्थानांतरित झाली.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारणी सदस्य सुहासराव हिरेमठ यांच्या शुभहस्ते हा पुन:प्रवेश सोहळा पार पडला. (DNS Bank Kulgaon Branch)
 
सदर कुळगाव शाखेचे उद्घाटन १९७८ साली तत्कालीन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परम पूजनीय संघचालक माननीय बाळासाहेब देवरस ह्यांनी केले होते. तेव्हापासून सदर शाखा बदलापूरकरांच्या विविध आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या सेवेत कार्यरत आहे. पुन:प्रवेशाच्या वेळी हिरेमठ यांच्या हस्ते नाम फलकाचे अनावरण देखील करण्यात आले. जाहीर उद्घाटन सोहळा नजीकच्याच काटदरे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विश्राम दीक्षित यांनी उपस्थित संचालकांचा आणि प्रमुख अतिथींचा परिचय त्यांच्या प्रास्ताविकात केला. (DNS Bank Kulgaon Branch)
 
बँकेचे अध्यक्ष ॲड. गणेश धारगळकर यांनी मार्च २०२६ अखेरच्या बँकेच्या सुदृढ आर्थिक स्थितीची माहिती उपस्थितांना दिली. बँकेचा ७००० कोटींहून असलेला अधिक व्यवसाय , भरघोस नफा आणि शून्य टक्के एनपीए याबद्दल टाळ्या वाजून सर्वांनी स्वागत केले. बँक देत असलेल्या डिजिटल बँकिंग सुविधांचा देखील त्यांनी आवर्जून उल्लेख केला. बँकेच्या यशात सर्व सभासद ग्राहक आणि हितचिंतक यांच्या मोलाचा वाटा आहे हे त्यांनी प्रकर्षाने नमूद केले. बँकेवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी सर्व कुळगाव- बदलापूरवासीयांचे आभार मानले. (DNS Bank Kulgaon Branch)
 
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात हिरेमठ यांनी डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या आजवरच्या यशस्वी प्रवासाचे कौतुक केले. संघ स्वयंसेवकांनी स्थापन केलेली बँक अशी बँकेची ओळख असून ग्राहकांना आर्थिक सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच सामाजिक कार्यात देखील डोंबिवली नागरी सहकारी बँक अग्रेसर आहे हे देखील त्यांनी आवर्जून नमूद केले. (DNS Bank Kulgaon Branch)
 
संघाच्या स्वयंसेवकांवर असलेला जनसामान्यांचा विश्वास त्यांनी विविध उदाहरणे देऊन सांगितला. राष्ट्रीय आपत्ती, नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कुठल्याही संकटाच्या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे आणि कुठलाही दुजाभाव अथवा मतभेद मनात न ठेवता देशातील समाजाच्या मदतीस वेळोवेळी धावले आहे. देशासाठी आणि देश बांधवांसाठी तन-मन-धनाने संघ स्वयंसेवक कार्यरत आहेत. अनेकदा विरोधी विचारसरणीच्या लोकांनी देखील संकट समयी संघ स्वयंसेवकांवर विश्वास दाखवला असल्याचे हिरेमठ यांनी सांगितले.
 
आधुनिक काळानुसार सर्वांनी योग्य ते बदल आपल्यामध्ये केले पाहिजे. बँकेने देखील हेच बदल अंगीकारून सदर वास्तु पुनर्विकसित करण्याचा निर्णय घेतला. आणि ग्राहकांच्या सेवेसाठी पुन्हा एकदा त्याच स्व-वास्तूत आज पासून कार्यरत झाली आहे. संघाकडे स्वतःचे काही नाही परंतु स्वयंसेवक संघाच्या दैनंदिन शाखेतून प्रेरणा घेऊन विविध उपक्रम हाती घेतात आणि समाजाच्या दृष्टीने आवश्यक अशा सर्व उपक्रमांना संघाचा पाठिंबा असतो. कालांतराने समाजातील गणमान्य प्रबुद्ध नागरिक हा उपक्रम स्वतःचा उपक्रम म्हणून पुढे नेतात. (DNS Bank Kulgaon Branch)
 
डोंबिवली नागरी सहकारी बँक देखील गेली ५६ वर्ष ही समाजाच्या विश्वास आणि भक्कम पाठिंब्यामुळे निरंतर कार्यरत आहे. "अर्थाला विश्वास मिळे आणि विश्वासाला अर्थ मिळे " हे बँकेचे घोषवाक्य अतिशय समर्पक असून बँकेची आर्थिक प्रगती अशीच उत्तरोत्तर होत जावो अशी सदिच्छा त्यांनी शेवटी व्यक्त केली.(DNS Bank Kulgaon Branch)
 
बँकेचे अनेक सभासद,ग्राहक, हितचिंतक सभागृहात प्रचंड संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते. कुळगाव ( बदलापूरच्या ) नगराध्यक्षा रुचिता घोरपडे देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होत्या. (DNS Bank Kulgaon Branch)
 
यावेळी अध्यक्षांच्या हस्ते हिरेमठ यांचा सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच नगराध्यक्षा घोरपडे यांना देखील पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. ज्यांनी ही शाखा पुनर्विकसित करून विहित कालावधीत ग्राहक सेवेसाठी सुसज्जित करून दिली असे प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अजय ठाणेकर यांचा देखील पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. (DNS Bank Kulgaon Branch)
 
सरते शेवटी कुळगाव शाखेचे शाखा व्यवस्थापक महेश श्रीरामे यांनी सर्व उपस्थितांचे आणि बँकेवर प्रेम करणाऱ्या सर्व ग्राहकांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. (DNS Bank Kulgaon Branch)
 
या कार्यक्रमाला बँकेचे उपाध्यक्ष सीए अभिजित मराठे, माननीय संचालक योगेश चौधरी, गजानन गोडबोले, डॉ संदीप घरत तसेच माजी संचालक नंदिनी कुलकर्णी, महेश फणसे, योगेश वाळुंजकर आणि वसंत नामजोशी उपस्थित होते.(DNS Bank Kulgaon Branch)
 
 
 
 




संबंधित मजकूर