टॅटू आणि अगरबत्तीतील रसायनांवर एफडीएचे नियंत्रण आणा

मुंबईच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांची मागणी

    11-Sep-2026
FDA control tattoo ink, agarbatti chemicals 
 
मुंबई : नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या टॅटूच्या शाईसह अगरबत्तीमध्ये वापरण्यात येणाऱ्या रसायनांवर अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) नियंत्रण असावे, अशी मागणी मुंबईच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी केली आहे. तसेच अधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांना विविध विभागांचे वेगवेगळे परवाने देण्याऐवजी एकाच ठिकाणी एकत्रित परवाना देण्याची व्यवस्था करावी, अशीही मागणी त्यांनी एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे केली आहे. (FDA Control Tattoo Ink Agarbatti Chemicals)
 
डॉ. राऊळ यांनी तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन या विविध विषयांवर चर्चा केली. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या काही उत्पादनांवर सध्या पुरेसे नियंत्रण नसल्याचा मुद्दा त्यांनी यावेळी उपस्थित केला.(FDA Control Tattoo Ink Agarbatti Chemicals)
 
टॅटू काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शाईच्या गुणवत्तेवर आणि त्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या घटकांवर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे राऊळ यांनी म्हटले आहे. काही व्यक्तींना टॅटूच्या शाईमुळे त्वचेची अॅलर्जी, सूज आणि इतर त्रास होऊ शकतात. काही प्रकारच्या शाईमध्ये आर्सेनिक, क्रोमियमसारखे विषारी धातू आणि अन्य घातक घटक असण्याची शक्यता असल्याने त्याची गुणवत्ता आणि सुरक्षिततेबाबत स्पष्ट नियम असावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.(FDA Control Tattoo Ink Agarbatti Chemicals)
 
पर्यटनस्थळे, हिल स्टेशन आणि जत्रांमध्ये अनेक ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात टॅटू काढण्याचे व्यवसाय केले जातात. मात्र, वापरण्यात येणाऱ्या शाईतील घटक, त्याचे संभाव्य दुष्परिणाम आणि सुरक्षिततेबाबत ग्राहकांना पुरेशी माहिती मिळत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.(FDA Control Tattoo Ink Agarbatti Chemicals)
 
अगरबत्तीतील रसायनांचीही माहिती द्या
 
अगरबत्तीच्या धुरामुळेही आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, असा मुद्दा डॉ. राऊळ यांनी उपस्थित केला. अगरबत्तीच्या धुरामुळे डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ, घशाचे त्रास तसेच दम्यासारख्या आजारांचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे अगरबत्तीमध्ये वापरण्यात येणाऱ्या रसायनांवरही नियंत्रण असावे, अशी मागणी त्यांनी केली.(FDA Control Tattoo Ink Agarbatti Chemicals)
 
अगरबत्तीच्या पाकिटावर त्यामध्ये वापरण्यात आलेल्या रसायनांची आणि घटकांची माहिती स्पष्टपणे नमूद करावी, जेणेकरून ग्राहकांना त्याबाबत माहिती मिळू शकेल, असेही त्यांनी सुचविले.(FDA Control Tattoo Ink Agarbatti Chemicals)
 
खाद्यविक्रेत्यांसाठी एकच परवाना
 
यावेळी अधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांना विविध विभागांकडून घ्यावे लागणाऱ्या परवान्यांचाही प्रश्न उपस्थित करण्यात आला. सध्या खाद्यविक्रेत्यांना एफडीएचा एफएसएसएआय परवाना तसेच महापालिकेचे स्वतंत्र परवाने घ्यावे लागतात.(FDA Control Tattoo Ink Agarbatti Chemicals)
 
हे परवाने वेगवेगळ्या प्राधिकरणांकडून घेण्याऐवजी ‘एक छत्री’ पद्धतीने एकच परवाना देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी डॉ. राऊळ यांनी केली. एकाच परवान्याची व्यवस्था झाल्यास विक्रेत्यांना वारंवार नूतनीकरण आणि वेगवेगळ्या कार्यालयांच्या फेऱ्यांचा त्रास कमी होईल, असे त्यांनी म्हटले आहे.(FDA Control Tattoo Ink Agarbatti Chemicals)
 
या सर्व मुद्द्यांवर एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याशी चर्चा करण्यात आली असून, त्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे डॉ. शुभा राऊळ यांनी सांगितले.(FDA Control Tattoo Ink Agarbatti Chemicals)




संबंधित मजकूर