वनार्टीसाठी १०० कोटींचा निधी मंजूर करा

आ. डॉ. तुषार राठोड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    11-Sep-2026
 

Approve a fund of Rs 100 crore for Vanarti
 
मुंबई : सारथी, महाज्योती, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, बार्टी आणि आर्टीच्या धर्तीवर भटक्या व विमुक्त जाती (व्हीजेएनटी) तसेच विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) विशेषतः विमुक्त जाती व भटक्या जमाती घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी) साठी आगामी अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करून संस्था पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी, अशी मागणी मुखेड-कंधार विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. तुषार राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. (Approve a fund of Rs 100 crore for Vanarti)
 
आमदार तुषार राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपल्या विविध मागण्यांचे पत्र सुपूर्द केले. पुरेशा निधीअभावी वनार्टी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नसल्याने या घटकातील गुणवंत विद्यार्थी व युवावर्ग शासकीय योजना,स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण आणि शिष्यवृत्तीपासून अपेक्षित लाभापासून वंचित राहत असल्याचे त्यांनी म्हटले. वनार्टी संस्थेच्या माध्यमातून युपीएससी, एमपीएससी, बँकिंग आणि संरक्षण क्षेत्रातील परीक्षांचे प्रशिक्षण उपलब्ध करून द्यावे, परदेशी शिक्षणासाठी फेलोशिप, एमफील, पीएचडी विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना व विद्यावेतन लागू करावे, वनार्टीच्या कामकाजासाठी पूर्णवेळ संचालक, संशोधन अधिकारी आणि आवश्यक कर्मचारी वर्गाची तातडीने पदभरती करावी. तसेच राज्यातील गरजू विद्यार्थी व लाभार्थ्यांपर्यंत संस्थेच्या योजना प्रभावीपणे पोहोचाव्यात यासाठी विभागीय स्तरावर वनार्टीची उपकार्यालये सुरु करावीत, अशीही मागणी आमदार डॉ. तुषार राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. (Approve a fund of Rs 100 crore for Vanarti)




संबंधित मजकूर