पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्तपदी अण्णा बनसोडे यांची निवड

मुंबईतील गरवारे क्लब येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारणीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली

    11-Sep-2026   

Anna Bansode Trustee People’s Education Society PES Mumbai
पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्तपदी अण्णा बनसोडे यांची निवड
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष तथा आमदार अण्णा बनसोडे यांची पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्तपदी नियुक्त करण्यात आली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारणीची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईतील गरवारे क्लब येथे केंद्रीय मंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.(PES Mumbai)
यावेळी सुखदेव थोरात, संचालक उज्ज्वल निकम, डॉ.वासुदेव गाडे, बी.के.बर्वे,विश्वास पाटील, डॉ. वेंकटा स्वामी, अरविंद सोनटक्के, डॉ.एस. एक. भागवत उपस्थित होते. अण्णा बनसोडे यांची विश्वस्तपदी निवड झाल्याने पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याला नवी दिशा मिळण्यास मदत होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.(PES Mumbai)
याप्रसंगी बोलताना विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांना सक्षम करण्याच्या उद्देशाने पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रसार आणि सामाजिक परिवर्तनाचे कार्य पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.(PES Mumbai)
प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार
विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे, संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा विस्तार करणे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शैक्षणिक वारसा पुढे नेण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार असल्याचेही अण्णा बनसोडे यांनी यावेळी सांगितले.(PES Mumbai)




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर