मुंबई,(अभिनंदन परुळेकर) : माय भारत युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकारतर्फे महाराष्ट्रामध्ये विकसित भारत युवा नेतृत्व संवाद २०२७ च्या अधिकृत शुभारंभाची घोषणा बुधवार दि.९ रोजी करण्यात आली. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा महोत्सवाची पुनर्रचना करून व्ही बी वाय एल डी २०२७ सुरू करण्यात आले असून १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक युवतींना नावीन्यपूर्ण कल्पना मांडण्यासाठी व गुणवत्ता आधारित व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठीचा हा सरकारचा प्रयत्न आहे.(Viksit Bharat Youth Leadership Dialogue 2027)
विशेष म्हणजे निवड झालेल्या युवांना दिल्ली येथील भारत मंडपम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आपले विचार मांडण्याची तसेच विकसित भारत २०४७ या संकल्पनेत योगदान देण्याची संधी मिळणार आहे.(Viksit Bharat Youth Leadership Dialogue 2027)
यामध्ये विकसित भारत चॅलेंज ट्रॅक ,सांस्कृतिक ट्रॅक, भारतासाठी डिझाईन, सामाजिक कारणासाठी हॅक, युवा उद्योजक चॅलेंज आणि युवा संसद असे प्रमुख सहा घटक आहेत. (Viksit Bharat Youth Leadership Dialogue 2027)
यासाठी माय भारत पोर्टलवर नोंदणी अनिवार्य असून बहुस्तरीय निवड प्रक्रिया असून विकसित भारत क्वीज, निबंध चॅलेंज, जिल्हा चॅम्पियनशिप ,राज्य , आणि राष्ट्रीय व्ही बी वाय एल डी अशी प्रक्रिया आहे.(Viksit Bharat Youth Leadership Dialogue 2027)
महाराष्ट्राची प्रादेशिक आव्हानाची थीम, नवंउन्मेष अर्थव्यवस्था, पर्यटन व सर्जनशील उद्योग असे आहे.(Viksit Bharat Youth Leadership Dialogue 2027)
याचे एकूण पाच टप्पे असून डिजिटल स्वरूपातील विकसित भारत क्वीज १७ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर दरम्यान, विकसित भारत निबंध डिजिटल स्वरूपात ५ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर दरम्यान, निबंध मूल्यांकन २२ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर ,जिल्हा चॅम्पियनशिप १० नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर ,राज्य आवृत्ती १७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर आणि शेवटचा पाचवा टप्पा राष्ट्रीय संवाद नवी दिल्ली या ठिकाणी १० जानेवारी ते १२ जानेवारी,२०२७ पर्यंत आहे.(Viksit Bharat Youth Leadership Dialogue 2027)
यात महाराष्ट्रातील जास्तीत जास्त युवाने सहभाग नोंदवावा आणि आपल्या कल्पना , सर्जनशीलता, नेतृत्व गुण याचा देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासासाठी उपयोग करावा असे आवाहन करण्यात आले आहे.(Viksit Bharat Youth Leadership Dialogue 2027)