टी-२ टर्मिनल लगतच्या अवैध मशिदीवर कारवाई होणार!शिवनेरीच्या बफर झोनमधील अनधिकृत बांधकामावरील कारवाईकडे शिवप्रेमींचे लक्ष

    10-Sep-2026   
T-2 Airport Mosque
 
मुंबई (T-2 Airport Mosque) : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील टी-२ टर्मिनलच्या व्हीआयपी आगमन आणि टॅक्सी स्टँडजवळील अवैध मशिदीवर लवकरच हातोडा पडणार असल्याचे समोर आले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवार, दि. १० सप्टेंबर रोजी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या पत्रावरून हे स्पष्ट झाले आहे.(T-2 Airport Mosque)
 
पत्रात नमुद केलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळच्या सिनियर प्लॅनर पल्लवी परांजपे यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी विष्णू झा यांना संबंधित अवैध बांधकाम हटवण्यासंबंधी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. (T-2 Airport Mosque)
 
आजपर्यंत एमएमआरडीएने संबंधित रचना/मशीद उभारण्यासाठी कोणतीही परवानगी दिलेली नाही. तसेच, संबंधित अधिसूचित क्षेत्राच्या अंतरिम विकास आराखड्यात सार्वजनिक उपासनेसाठी कोणत्याही जागेची तरतूद, आरक्षण, वाटप किंवा नामनिर्देशन करण्यात आलेले नाही, असेही नमूद करण्यात आले आहे.(T-2 Airport Mosque)
 
पत्रात पुढे म्हटले की, संचालन, व्यवस्थापन आणि विकास करारानुसार, संबंधित अधिसूचित क्षेत्रातील नियोजन, विकास, बांधकाम, देखभाल तसेच पायाभूत सुविधा, वैमानिक सुविधा आणि इतर आवश्यक सुविधांच्या विकासाची संपूर्ण जबाबदारी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड यांच्यावर आहे. संबंधित बाबींचा विचार करून संबंधित अधिसूचित क्षेत्रातील सदर रचना/मशीद हटविण्यासंदर्भात कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून आवश्यक ती पुढील कार्यवाही करावी आणि त्याबाबतचा अनुपालन अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.(T-2 Airport Mosque)
 
भू-माफियांच्या माध्यमातून अतिक्रमण
 
गेल्या १० वर्षांपासून याठिकाणी ही मशीद अस्तित्वात आल्याचे समजते. विमानतळाची जमीन अतिक्रमणाच्या विळख्यात कशी गेली? या जागेवर अनधिकृत बांधकामाला वीज आणि पाणीपुरवठा कसा मिळाला? वातानुकूलित यंत्रणा आणि विद्युत उपकरणे बसविण्याची परवानगी कोणी दिली? असे सवाल किरीट सोमय्या यांनी विमानतळ परिसरातील संबंधित जागेची पाहणी करतेवेळी उपस्थित केले होते. त्याचबरोबर या जागेवर ‘लँड जिहाद’ आणि भू-माफियांच्या माध्यमातून अतिक्रमण करण्यात आले असून बांगलादेशी घुसखोरांनी विमानतळाची जमीन ताब्यात घेतल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता.(T-2 Airport Mosque)
 
शिवनेरी परिसरातील अवैध बांधकामाच्या कारवाईकडे शिवप्रेमींचे लक्ष
 
शिवनेरीच्या बफर झोनमधील अनधिकृत बांधकामाच्या कारवाईकडे आता शिवप्रेमींचे लक्ष लागले आहे. किल्ला परिसरातील कबर, दर्गा तसेच इतर संरचना नेमक्या कोणत्या कालखंडात निर्माण झाल्या, त्याबाबत महसूल अभिलेख, उपलब्ध ऐतिहासिक दस्तऐवज तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्याचे निर्देश दि. ८ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या संरचना पूर्वीपासून अस्तित्वात होत्या की अलीकडच्या काळात निर्माण करण्यात आल्या, याची निश्चित पडताळणी करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी दिल्या आहेत.(T-2 Airport Mosque)
 
भूसंपादन प्रक्रियेचे पुढे काय झाले?
 
गुहागरमधील गोपाळगड किल्ला पूर्णपणे शासकीय अखत्यारीत आणण्यासाठी पुरातत्व विभागाने २७ जुलै दरम्यान अधिकृत भूसंपादन प्रक्रिया सुरू केली. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होताच गोपाळगड किल्ल्याची जागा अधिकृतपणे शासनाच्या नावावर हस्तांतरित होईल; त्यानंतर पुरातत्व विभागामार्फत किल्ल्याच्या ढासळलेल्या तटबंदीची दुरुस्ती, मुख्य प्रवेशद्वाराचे जतन, माहिती फलक आणि पर्यटकांसाठी आवश्यक प्राथमिक सुविधा तातडीने उभारल्या जातील, असे त्यादरम्यान सांगण्यात आले होते. 'आजपर्यंत जागा मालकाने जे काही किल्ल्याचे नुकसान केले, त्याचे व्हॅल्युएशन करून ती रक्कम दिल्या जाणाऱ्या मोबदल्यातून वजा करावी. भूसंपादन करताना ही गोष्ट लक्षात येईल. त्यामुळे हा विचार शासनाकडून गांभीर्याने करण्यात यावा.' अशी मागणी तेव्हा गोपाळगड संरक्षकांनी केली होती. भूसंपादन प्रक्रियेचे पुढे काय झाले? व्हॅल्युएशनबाबत काय निर्णय झाला? याकडे सर्व शिवप्रेमींचे लक्ष लागले आहे. (T-2 Airport Mosque)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर