नागपूर, (Rohit Pawar Congress Joining) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आ. रोहित पवार यांच्यावर त्यांच्या पक्षातील वरीष्ठ नेते नाराज असून लवकरच ते काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचा दावा भाजप आ. परिणय फुके यांनी केला आहे. (Rohit Pawar Congress Joining)
अलीकडेच रोहित पवार यांनी भंडारा-गोंदिया जिल्ह्याचा दौरा केला. याविषयी बोलताना आ. परिणय फुके म्हणाले की, "रोहित पवार यांनी नाना पटोले यांना खुश करण्यासाठी भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या दौरा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचे सुप्रिया सुळे यांच्यासोबत जमत नाही. ते नेहमी सुप्रियाताईंना विरोध करत असल्याने राष्ट्रवादीतील वरीष्ठ नेते रोहित पवारांच्या विरोधात आहेत. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात असल्याचे मला दिसते. त्यामुळे त्यांनी नाना पटोलेंना खुश करण्यासाठी भंडारा-गोंदिया जिल्ह्याचा दौरा केला." (Rohit Pawar Congress Joining)
कॉक्रोच जनता पार्टीची धास्ती
"कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर देशात राहुल गांधी आणि राज्यात रोहित पवार यांना धास्ती बसली आहे. आपले जेवढे आमदार, खासदार निवडून आले आहेत तेवढेही पुढे निवडून येतील की, नाही? की, कॉक्रोच जनता पार्टीचेच आमदार, खासदार निवडून येतील, याविषयी दीपकेंसोबत त्यांची स्पर्धा सुरु आहे," असा दावाही परिणय फुके यांनी केला. (Rohit Pawar Congress Joining)
चुकीच्या पद्धतीने झालेल्या नोंदणीची चौकशी व्हावी
"ओबीसी जात प्रमाणपत्र देताना चुकीच्या पद्धतीने किंवा दबावात येऊन काही नोंदण्या झाल्या असल्यास किंवा जात प्रमाणपत्र दिले असल्यास त्याची चौकशी झाली पाहिजे. पण राज्य सरकारने महाराष्ट्रात ५८ लाख नोंदणी करण्याचे काम केले आहे. ही प्रक्रिया दरवर्षी असेच सुरु असते. यात काही चुका झाल्या असल्यास त्याची चौकशी झाली पाहिजे," असेही ते म्हणाले. (Rohit Pawar Congress Joining)
जरांगे पाटील बालहट्ट करतात
"मनोज जरांगे पाटील हे थोडा बालहट्ट करत आहेत असे मला वाटते. केंद्र सरकार किंवा राज्य सरकार संविधानाच्या बाहेर कोणत्याही समाजाला आरक्षण देऊ शकत नाही. मराठा समाजाला ओबीसी समाजात समाविष्ट करण्याचा अधिकार कोणत्याही सरकारला नाही. स्वत:ची लोकप्रियता साबूत ठेवण्यासाठी जरांगे पाटील परत परत आंदोलन करत आहेत. त्यांना मराठा समाजाला आरक्षण देण्यात कोणताही रस नाही. मराठा आणि ओबीसी या दोन समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत असतात. पण महाराष्ट्र ही संतांची भूमी असून इथे कोणत्याही समाजात वाद नाही. मराठा समाजाला ईडब्ल्यूएसमध्ये १० टक्के आरक्षण दिले असून त्यांनी त्या आरक्षणाचा लाभ घेतला पाहिजे. वारंवार अशा प्रकारचे आंदोलन करून सरकारला किंवा कुणालाही दबावात आणू नये. कोणत्याही धमक्यांना कुणीही घाबरणार नाही," असेही परिणय फुके म्हणाले. (Rohit Pawar Congress Joining)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....