MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय;चौकशीपासून परीक्षा सुधारणांपर्यंत महत्त्वाच्या घोषणा

MPSC Exam Reforms
 
 
मुंबई,(MPSC Exam Reforms): महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबाबत विद्यार्थी प्रतिनिधींनी मांडलेल्या विविध मागण्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत सविस्तर चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या ऐकून घेतल्यानंतर शासनाकडून चौकशी, परीक्षा पद्धतीतील सुधारणा आणि तक्रार निवारणासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.(MPSC Exam Reforms)
 
औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास सखोलपणे सुरू असून, हा तपास अंतिम टप्प्यापर्यंत नेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. “प्रणाली सुधारण्यात आम्हाला रस आहे, लपवण्यात नाही,”अशी भूमिका त्यांनी मांडली.(MPSC Exam Reforms)
 
परीक्षा प्रक्रियेत सर्वंकष सुधारणा करण्यासाठी व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती राज्यभर जाऊन विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संबंधित घटकांशी संवाद साधणार असून, त्यांच्या सूचना व तक्रारी जाणून घेणार आहे.(MPSC Exam Reforms)
 
2025च्या गट ब आणि गट क परीक्षांची चौकशी
 
गट ब आणि गट कच्या मुख्य व पूर्व परीक्षा 2025 संदर्भातील तक्रारींची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या इतर तक्रारींच्या निराकरणासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार असून, त्याची चौकशी एसआयटीमार्फत केली जाणार आहे.(MPSC Exam Reforms)
 
माहिती अधिकारांतर्गत विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका उपलब्ध करून देण्याची शिफारस एमपीएससीला करण्यात येणार आहे. ज्या इतर परीक्षांबाबत तक्रारी आहेत, त्यांचीही फेरतपासणी केली जाणार असून, तोपर्यंत संबंधित परीक्षांच्या मुलाखती स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.(MPSC Exam Reforms)
 
जुन्या परीक्षा आणि अधिकाऱ्यांच्या कार्यकाळाचीही चौकशी
 
लेंडवे, मराठे आणि नखाते यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व परीक्षांची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. तसेच राजूरकर समितीच्या शिफारसींची पडताळणी करून योग्य शिफारसींची अंमलबजावणी केली जाईल.(MPSC Exam Reforms)
 
एमपीएससीचे अध्यक्ष आणि सचिव यांच्याविरोधात ठोस पुरावे सादर झाल्यास स्वतंत्र चौकशी करण्याची तयारीही मुख्यमंत्र्यांनी दर्शवली. दोषी आढळणाऱ्या कोणालाही वाचवले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पुढील आठ दिवसात कारवाईबाबत कालबद्ध प्रक्रिया सुरू करण्याची येईल अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.(MPSC Exam Reforms)
 
पोलिस भरतीतही बदल
 
पोलिस भरती प्रक्रियेत उमेदवारांच्या दोन्ही पायांना चिप बसवणे किंवा त्यासारख्या अन्य पर्यायांचा विचार केला जाणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात पोलिस भरतीसाठी गुणांकनाचा एकसमान पॅटर्न लागू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. सारथी, बार्टी आणि महाज्योतीशी संबंधित विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचेही निराकरण करण्यात येणार आहे. मुलाखतीच्या प्रक्रियेसाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्याबाबतही समितीला सूचना देण्यात येणार आहेत.(MPSC Exam Reforms)
 
PMC आणि MMRDA परीक्षांचीही चौकशी
 
PMC आणि MMRDA परीक्षांबाबत आलेल्या तक्रारींची सखोल चौकशी करण्यात येणार असून, दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गुन्हे शाखेच्या तपासाचा प्राथमिक अहवालही सार्वजनिक करण्यात येणार आहे. संपूर्ण प्रक्रिया कालबद्ध पद्धतीने राबवून पुढील आठ दिवसांत कारवाईची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.(MPSC Exam Reforms)
 
पुढील परीक्षा लांबणीवर; तक्रार निवारण कक्षाची स्थापना
 
मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया प्रथमच होत असल्याने संपूर्ण यंत्रणा सज्ज झाल्यानंतरच पुढील परीक्षा घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या हितासाठी काही परीक्षा लांबणीवर टाकण्यात येणार असून, परीक्षा पारदर्शक आणि फुलप्रूफ असणे हा मुख्य निकष असेल. एमपीएससीमध्ये स्वतंत्र समर्पित तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात येणार असून, त्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या तक्रारींना संस्थात्मक पातळीवर न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.(MPSC Exam Reforms)
 
 
 
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर