गणेशभक्तांच्या कोकण प्रवासाला टोलमाफी; गणेशभक्तांना दिलासा,पथकरातून मिळणार सवलत.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांची माहीती

    10-Sep-2026
 
 
Konkan Ganeshotsav Toll Waiver 2026
 
 
मुंबई,(अभिनंदन परुळेकर) : गणेशोत्सवानिमित्त कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना यंदा शासनाकडून मोठा दिलासा मिळणार आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत कोकणाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना पथकरातून (टोल) सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. दि. ११ सप्टेंबर २०२६ ते दि. २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मुंबई–बंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८, मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील कोकणाकडे जाणाऱ्या संबंधित मार्गांवरील पथकर नाक्यांवर ही टोलमाफी लागू राहणार आहे. याशिवाय नगरविकास विभागाच्या अखत्यारीतील अटल बिहारी वाजपेयी शिवडी–न्हावा शेवा अटल सेतूमार्गे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांनाही पथकरमाफीचा लाभ मिळणार आहे.(Konkan Ganeshotsav Toll Waiver 2026)
 
"गणेशभक्तांना प्रवासादरम्यान कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि संवेदनशीलतेने काम करावे,” असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी सांगितले.(Konkan Ganeshotsav Toll Waiver 2026)
 
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत बुधवार दि. ८ रोजी शासन परिपत्रक जारी केले आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागासह पोलीस, वाहतूक पोलीस, प्रादेशिक परिवहन विभाग आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने परस्पर समन्वयाने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.(Konkan Ganeshotsav Toll Waiver 2026)
 
गणेशभक्तांना टोलमाफीचा लाभ घेताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी ‘गणेशोत्सव २०२६ कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्वतंत्र स्टिकर किंवा पास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या पासवर संबंधित वाहनाचा क्रमांक आणि चालकाचे नाव नमूद केले जाणार आहे. परिवहन विभाग, वाहतूक पोलीस, पोलीस विभाग आणि संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या समन्वयातून आवश्यक त्या ठिकाणी हे पास उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. पोलिस स्टेशन, वाहतूक
 
 
पोलीस चौक्या तसेच आरटीओ कार्यालयांमध्येही पास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सदर पास परतीच्या प्रवासासाठीदेखील ग्राह्य धरला जाणार असल्याने कोकणातून परतताना गणेशभक्तांना पुन्हा टोलमाफीचा लाभ मिळणार आहे.(Konkan Ganeshotsav Toll Waiver 2026)
 
गणेशोत्सवाच्या काळात महामार्गांवर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने वाहतूक सुरळीत ठेवणे हे प्रशासनासमोरील महत्त्वाचे आव्हान असते. टोलमाफीच्या निर्णयामुळे टोल नाक्यांवर होणारी गर्दी आणि संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेऊन पोलीस आणि परिवहन विभागाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गणेशभक्तांना पास मिळविणे, त्याची तपासणी करणे आणि टोलमाफीचा लाभ मिळवून देणे ही प्रक्रिया सुलभ आणि वेगवान करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक नियोजन करावे, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.(Konkan Ganeshotsav Toll Waiver 2026)
 
गणेशोत्सवाच्या कालावधीत टोलमाफीची सुविधा आणि पास उपलब्धतेबाबतची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी पोलीस आणि परिवहन विभागाने आवश्यकतेनुसार सूचना, जाहिराती आणि जनजागृतीच्या माध्यमातून नागरिकांना माहिती द्यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. कोणत्या मार्गावर टोलमाफी लागू आहे, पास कुठे मिळेल आणि परतीच्या प्रवासासाठी पास कसा ग्राह्य राहील, याबाबत स्पष्ट माहिती गणेशभक्तांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.(Konkan Ganeshotsav Toll Waiver 2026)
 
 
 




संबंधित मजकूर