ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट

    10-Sep-2026
Jaykumar Gore Meets Anna Hazare
 
 
 
मुंबई, (अभिनंदन परुळेकर) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. बुधवार दि. ९ रोजी हॉस्पिटलमध्ये जाऊन अण्णा हजारे यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली.(Jaykumar Gore Meets Anna Hazare)
 
यावेळी अण्णांवर उपचार करणारे प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. गौतम भन्साळी यांच्याकडून त्यांच्या प्रकृतीची तसेच सुरू असलेल्या उपचारांची सविस्तर माहिती जाणून घेतली.(Jaykumar Gore Meets Anna Hazare)
 
'अण्णा हजारे यांनी आपल्या कार्यातून समाजहित, भ्रष्टाचारविरोधी लढा आणि जनजागृतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या विचारांची आणि मार्गदर्शनाची समाजाला आजही नितांत गरज आहे. त्यांनी लवकरात लवकर पूर्णपणे बरे होऊन पुन्हा समाजकार्यात सक्रिय व्हावे, यासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या."असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री गोरे यांनी केले.(Jaykumar Gore Meets Anna Hazare)
 
यावेळी खाजगी सचिव सुनील कोठेकर, ओएसडी किशोर बोरहाटणे व इतर अधिकारी उपस्थित होते. (Jaykumar Gore Meets Anna Hazare)
 
 




संबंधित मजकूर