मुंबई, (Eco-Friendly Ganeshotsav 2026) : गणेशमूर्तीच्या भव्यतेपेक्षा भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाला अधिक महत्त्व आहे. गणेशोत्सवासारखा सांस्कृतिक वारसा जपणारा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.(Eco-Friendly Ganeshotsav 2026)
वाशी येथील सिडको एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित ‘पर्यावरणपूरक महा गणेश मूर्ती कार्यशाळा २०२६’मध्ये मुख्यमंत्री बोलत होते. या भव्य कार्यशाळेत एकाच वेळी १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती साकारत महाराष्ट्राच्या नावावर नवा ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ प्रस्थापित केला.(Eco-Friendly Ganeshotsav 2026)
या ऐतिहासिक उपक्रमाला पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, वनमंत्री गणेश नाईक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, आमदार मंदा म्हात्रे, आमदार रवींद्र फाटक, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे, ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि कला संचालनालयाचे संचालक डॉ. नितीन इंगळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.(Eco-Friendly Ganeshotsav 2026)
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी गणेशोत्सव आणि पर्यावरण यातील नाते अधोरेखित केले. गणराया ही बुद्धीची देवता असून भारतीय संस्कृतीत पर्यावरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सृष्टीची निर्मिती करणाऱ्या पंचमहाभूतांचे रक्षण झाले तरच मानवी जीवन सुरक्षित राहू शकते, असे त्यांनी सांगितले.(Eco-Friendly Ganeshotsav 2026)
मोठ्या गणेशमूर्ती, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आणि कृत्रिम रंगांमुळे जलस्रोतांचे होणारे प्रदूषण टाळण्याचे आवाहनही त्यांनी केले. मूर्ती लहान असो किंवा मोठी, भक्ती सारखीच असते. ईश्वराचा आशीर्वाद हा मूर्तीच्या आकारावर नव्हे, तर आपण पर्यावरण आणि समाजाची किती निस्वार्थ सेवा करतो यावर ठरतो, असा संदेश मुख्यमंत्र्यांनी दिला.(Eco-Friendly Ganeshotsav 2026)
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या परीक्षकांनी विक्रमाची घोषणा करताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी या यशाचे खरे शिलेदार सहभागी विद्यार्थी असल्याचे सांगत त्यांचे अभिनंदन केले. तसेच पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, पर्यावरण विभाग, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट आणि कला संचालनालयाने केलेल्या प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केले.(Eco-Friendly Ganeshotsav 2026)
पंकजा मुंडे यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना शाडू मातीपासून बाप्पा घडविणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी स्वतःला ‘वसुंधरा रक्षक’ म्हणून सिद्ध केले आहे, असे सांगितले. संस्कृती जपत पर्यावरण रक्षणाचा संदेश घराघरात पोहोचविणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(Eco-Friendly Ganeshotsav 2026)
‘आपण स्वतः पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घडवू शकतो, तर प्रत्येक कुटुंबही हे करू शकते’, असा प्रत्यक्ष कृतीतून दिलेला संदेश या उपक्रमातून देण्यात आला. हजारो विद्यार्थी, कला क्षेत्रातील तज्ज्ञ, प्राध्यापक आणि गणेशभक्तांच्या उपस्थितीत जागतिक विक्रमासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेशही मोठ्या दिमाखात देण्यात आला.(Eco-Friendly Ganeshotsav 2026)
मुख्यमंत्री फडणवीस यांनी साकारला पर्यावरण पूरक बाप्पा
ढोल-ताशांच्या मंगल गजरात आणि मूर्तिकारांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यशाळेचे विशेष आकर्षण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वतः शाडूची माती हातात घेऊन गणेशमूर्ती साकारली. राज्याचे नेतृत्व स्वतः पर्यावरणपूरक बाप्पा घडवताना पाहून विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला.(Eco-Friendly Ganeshotsav 2026)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.